शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चायनिज खवय्यांमध्ये कोरोनाची भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 14:26 IST

शहरात चायनिज विक्री करणाºयांकडील गर्दी मोठ्या प्रमाणात घसरल्याचे वास्तव लोकमतच्या पाहणीत आले आहे.

- सचिन राऊत

अकोला : कोरोनाचा धसका आता चायनिज खाद्यपदार्थ खाणाऱ्यांनीही घेतला आहे. शहरात चायनिज विक्री करणाºयांकडील गर्दी मोठ्या प्रमाणात घसरल्याचे वास्तव लोकमतच्या पाहणीत आले आहे.कोरोना व्हायरसची सध्या सर्वत्र दहशत निर्माण झाली आहे. चायनिज पदार्थांकडेही खवय्यांचा ओढा कमी झालेला आहे. चायनिज पदार्थ खाणाºयांमध्ये कोरोनाची भीती असल्याने ४० टक्क्याने ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे. सध्या चिनी माल आणि चायनिज पदार्थ विक्रीवर होणाºया लाखो रुपयांच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी प्रत्येक जण चायनिज सेंटर गाठतो. चायजिन खाणाºयांची संख्या वाढल्याने प्रत्येक शहरात चायनिज पदार्थ विक्रीच्या माध्यमातून दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होते; परंतु चायनिज पदार्थांच्या या विक्रीला कोरोना विषाणूमुळे मोठा फटका बसला आहे. सतत गजबजणारी चौपाटी कोरोनाच्या भीतीमुळे शांत झाली आहे. कोरोना व्हायरसची दहशत पसरल्यापासून चायनिज पदार्थ खाणाºया ग्राहकांची संख्या ४० टक्क्याने कमी झाली आहे. चायनिज पदार्थ खाल्ल्याने त्यांनाही कोरोना व्हायरसची लागण होईल, या भीतीने काही दिवस चायनिज न खाल्लेलेच बरे, अशी सावधगिरीची भूमिका ग्राहक आता बाळगत आहेत. हॉटेल्समध्येही चायनिज मागणाºयांची संख्या कमी झाल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. चायनिज पदार्थांमधील हे खाद्य येते चीनमधून?चीनमध्ये तयार होणारी चिली बिन पेस्ट आणि तिथून येणारे काही मसाले तुम्ही चायनिजमध्ये वापरता का, असे अनेक प्रश्न ग्राहक चायनिज सेंटर चालकांना विचारत आहेत. या खाद्यपदार्थांसाठी कच्चा माल हा चीनमधूनच येत असल्याची माहिती आहे. चायनिज पदार्थांकडे पाहिले जाते संशयानेचायनिज पदार्थामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट, शेजवान सॉस, कृत्रिम रंग, स्टार्च कॉर्न यांसारखे जिन्नस वापरल्यामुळे पचनशक्तीवर ताण येऊन ती बिघडू शकते. चायनिजच्या प्रत्येक पदार्थामध्ये सॉस असतो. नेमका हा सॉस चीनमधून येतो की इतर कोठून, असा प्रश्न ग्राहकांमध्ये आहे. त्यामुळे सध्या कोरोनाच्या भीतीमुळे चायजिन पदार्थांकडे ग्राहक संशयाने बघत आहेत. चायनिज सेंटरवर मिळणारे नुडल्स, वेगवेगळे राईस, सोया चिली, मन्चुरियन, ड्रॅगन फुट्स अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये सॉस हा महत्त्वाचा घटक असतो; परंतु अकोल्यामध्ये जळगाव खान्देशमधून सॉस आणला जात असल्याची माहिती एका विक्रेत्याने दिली. चायनिज सेंटरवर तयार होणारे पदार्थ हे येथेच तयार केले जातात, त्यामुळे त्याची भीती बाळगण्याचे काही कारण नाही.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAkolaअकोला