शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

रुग्णवाढीचे सत्र सुरुच; अकोल्यात आणखी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 12:25 IST

शनिवार, ८ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात आणखी ३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्देकोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २९५५ झाली आहे.सद्यस्थितीत ४९६ जणांवर उपचार सुरु आहेत.

अकोला : जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत आहे असे संकेत मिळत असतानाच गत आठवडाभरापासून नव्याने रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. शनिवार, ८ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात आणखी ३२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २९५५ झाली असून, सद्यस्थितीत ४९६ जणांवर उपचार सुरु आहेत.जुलै महिन्याच्या उत्तरार्धात नव्याने रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण किंचित घटले होते. आॅगस्ट महिना सुरु होताच रुग्णवाढीचा वेग वाढला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून शनिवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे १५० अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ३२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११८ अहवाल निगेटिव्ह असल्याचे निदान झाले आहे.पॉझिटिव्ह असल्याचे निदान झालेल्या रुग्णांमध्ये १८ महिला व १४ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये रामनगर येथील पाच जणांसह बार्शीटाकळी येथील तीन जण, मुर्तिजापूर येथील तीन जण, प्रसाद कॉलनी येथील तीन जण, दाळंबी येथील तीन जण, केशव नगर येथील दोन जण, केळकर हॉस्पिटल येथील दोन जणांचा समावेश आहे. याशिवाय बोरगाव मंजू, रतनलाल प्लॉट, न्यू भिमनगर, चिंतामणी नगर, डाबकी रोड, सिंधी कॅम्प, गोपालखेड, मलकापूर, जीएमसी वसतीगृह, आनंद नगर, सस्ती ता. बाळापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

४९६ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९५५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २३४५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४९६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्राप्त अहवाल- १५०पॉझिटीव्ह- ३२निगेटीव्ह-११८

आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- २४५७+४६६=२९५५मयत-११४डिस्चार्ज- २३४५दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)- ४९६

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या