शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३७ पॉझिटिव्ह बाळंतिणींच्या एकाही शिशूला कोरोनाची बाधा नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 10:07 IST

खबरदारीमुळे एकाही नवजात शिशूला कोरोनाची बाधा झाली नसल्याने आरोग्य यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे.

- प्रवीण खेते लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गत महिनाभरात जिल्ह्यात ३७ गर्भवतींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे या गर्भवतींच्या प्रसूतीनंतर नवजात शिशूंना कोरोनापासून वाचविण्याचे मोठे आवाहन आरोग्य विभागासमोर होते; मात्र जिल्हा स्त्री रुग्णालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या विशेष खबरदारीमुळे एकाही नवजात शिशूला कोरोनाची बाधा झाली नसल्याने आरोग्य यंत्रणेला मोठे यश मिळाले आहे.जिल्ह्यात विशेषत: शहरात कोरोनाचा कहर सुरू झाल्याने कंटेनटमेन्ट झोनची संख्याही वाढू लागली. त्यामुळे या भागातून येणाऱ्या रुग्णांवर विशेष लक्ष दिले जाऊ लागले होते. दरम्यान, अशा भागातून येणाºया गर्भवतींमध्येही कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने जिल्हा स्त्री रुग्णालयाने खबरदारी म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती केली. अशा गर्भवतींचे प्रसूतीपूर्वीच स्वॅब घेणे सुरू केले. त्यात काही महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. ही संख्या वाढू लागल्याने मध्यंतरी आरोग्य यंत्रणेतर्फे सर्वोपचार रुग्णालयातील स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभाग कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतींसाठी आरक्षित करण्यात आला. गत महिनाभरात या ठिकाणी जवळपास ३७ पॉझिटिव्ह गर्भवतींची प्रसूती करण्यात आली. यातील १४ गर्भवतींचे सिझर झाले असून, अशा परिस्थितीत संक्रमणाचा जास्त धोका होता; मात्र विशेष बाब म्हणजे यातील एकाही नवजात शिशूला कोरोनाची बाधा झाली नसून, बाळंतिणीसह शिशूंची प्रकृती उत्तम असल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोना होऊ नये म्हणून शिशूंची विशेष काळजीवृद्धांप्रमाणेच नवजात शिशूंचीही रोग प्रतिकारकशक्ती कमी असते. त्यामुळे माता पॉझिटिव्ह असताना नवजात शिशूंनाही कोरोनाचा धोका जास्तच असतो. अशा परिस्थितीत शिशूंना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणेद्वारे विशेष काळजी घेण्यात आली.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पॉझिटिव्ह मातांपासून शिशूंना आणि वैद्यकीय कर्मचाºयांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. आतापर्यंत एकाही नवजात शिशूला कोरोनाची बाधा झाली नाही, हे मोठे यश आहे.- डॉ. श्यामकुमार शिरसाम,वैद्यकीय अधीक्षक,जीएमसी, अकोलास्वत:चाही केला कोरोनापासून बचावपॉझिटिव्ह गर्भवतींची प्रसूती करताना डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाºयांचा थेट संपर्क येतो. त्यामुळे जवजात शिशूंसह स्वत:चाही कोरोनापासून बचाव करण्याचे मोठे आव्हान डॉक्टर व कर्मचाºयांवर होते. ही जबाबदारी चोख पार पाडत डॉक्टरांनी स्वत:चा कोरोनापासून बचाव करत एकाही शिशूला कोरोनाची बाधा होऊ दिली नाही, हे विशेष.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय