शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

अकोल्यात कोरोनाबळींचा उच्चांक, बुधवारी १७ जणांचा मृत्यू, ७५४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 10:32 IST

Corona update Akola : कोरोनाने बुधवारी आणखी १७ जणांचा बळी घेतला असून ७५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असून मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. कोरोनाने बुधवारी आणखी १७ जणांचा बळी घेतला असून ७५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये आरटीपीसीआरचे ५७३, तर रॅपिड ॲन्टिजेनचे १८१ पॉझिटिव्ह अहवाल आहेत. दिवसभरातील मृत्यू आणि रुग्णसंख्या हे आतापर्यंतचे उच्चांकी आकडे असून जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अकोलेकरांना घरातच थांबा, असा सल्ला आरोग्य विभागाकडून दिला जात आहे. कोरोनाचा कहर सुरूच असून बुधवारी आणखी १७ जणांचा बळी गेला आहे. यामध्ये वाडेगाव येथील २८ वर्षीय महिलेसह हाजी नगर येथील ५४ वर्षीय पुरुष, राहुल नगर येथील ३२ वर्षीय पुरुष, मालेगाव ता. तेल्हारा येथील ४५ वर्षीय पुरुष, शिवर येथील ५२ वर्षीय महिला, शिवनी येथील ७१ वर्षीय पुरुष, शिसामासा येथील ५० वर्षीय पुरुष, शेकापूर ता. पातूर येथील ७२ वर्षीय पुरुष, गड्डम प्लॉट येथील ७५ वर्षीय महिला, दहिहांडा ता. अकोट येथील ७८ वर्षीय पुरुष, व्हीएचबी कॉलनी येथील ४२ वर्षीय पुरुष, वानखडे नगर येथील ३१ वर्षीय पुरुष, वस्तापूर ता. अकोट येथील ३२ वर्षीय पुरुष, मुर्तिजापूर येथील ५२ वर्षीय महिला, वृंदावन नगर येथील ५४ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. यासह खासगी रुग्णालयातून दोघांचे मृत्यू झाले. त्यात आळसी प्लॉट येथील ६० वर्षीय पुरुष, तर पातूर येथील ४२ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यूचा आकडा ५९५ वर पोहोचला असून, बाधितांचा आकडा ३५४३७ वर पोहोचला आहे. सद्यस्थितीत ५५९९ रुग्णांवर कोविडचा उपचार सुरू असून, यातील बहुतांश रुग्ण गृह विलगीकरणात दाखल आहेत.तालुकानिहाय रुग्णसंख्या (आरटीपीसीआर अहवालानुसार)तालुका - रुग्णमुर्तिजापूर - ०४अकोट - ९३बाळापूर - ४५तेल्हारा - ०६बार्शिटाकळी - १८पातूर - ५७अकोला - ३५० (ग्रामीण ३४, मनपा-३१६)१३१ रुग्णांना डिस्चार्जरुग्णसंख्या वाढीच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या खालावली आहे. बुधवारी १३१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, यापैकी ३७ रुग्ण गृह विलगीकरणातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २९ हजार २४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.३७
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला