शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’च्या संकटात मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार निम्म्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 10:17 IST

दर दिवसाला केवळ ७० ते १०० मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘कोरोना’चे संकट आणि लागू असलेल्या ‘लॉकडाउन’च्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार निम्म्यावर आले आहेत. जिल्ह्यात दररोज सरासरी १५० ते २०० होणारे खरेदी-विक्रीचे व्यवहार ‘कोरोना’ संकटाच्या परिस्थितीत दर दिवसाला केवळ ७० ते १०० मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेली संचारबंदी आणि ‘लॉकडाउन’च्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ३० मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार १४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये व या कार्यालयामार्फत होणारे स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २० एप्रिलपासून जिल्ह्यात दुय्यम निबंधक कार्यालयांतर्गत होणारे मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि मुद्रांक शुल्कविषयक दस्त नोंदणी आॅनलाइन प्रणालीद्वारे पूर्ववत सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील १३ दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दररोज सरासरी १५० ते २०० मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार होत होते; मात्र कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि लॉकडाउनच्या परिस्थितीत सध्या जिल्ह्यात दर दिवसाला सरासरी केवळ ७० ते १०० मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार होत आहेत. त्यामुळे ‘कोरोना’च्या संकटात जिल्ह्यातील स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार निम्म्यावर आल्याचे वास्तव आहे.

नवीन व्यवहार कमी;गहाण, इसारखताचे व्यवहार जास्त!कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात स्थावर मालमत्ता खरेदी-विक्रीचे प्रमाण निम्म्यावर आले आहे. त्यामध्ये नवीन व्यवहाराचे प्रमाण कमी असून, गहाणखत, इसारखत व बक्षीसपत्राच्या व्यवहाराचे प्रमाण जास्त असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाRevenue Departmentमहसूल विभाग