शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संकट: गरिबांना मिळणार मोफत गहू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 10:10 IST

प्रत्येक लाभार्थीला ३ किलो गहू आणि २ किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.

- संतोष येलकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत यापूर्वी राज्यातील प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेतील गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना प्रतिमहा प्रत्येकी ५ किलो मोफत तांदळाचे वितरण करण्यात येत होते. १० जुलै रोजी शासनाच्या पुरवठा विभागामार्फत देण्यात आलेल्या आदेशानुसार आता राज्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत तांदळासोबतच गहू मोफत मिळणार आहे. त्यामध्ये प्रत्येक लाभार्थीला ३ किलो गहू आणि २ किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींना गत एप्रिल ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिमहा प्रत्येक लाभार्थीस ५ किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात आले. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत गरीब शिधापत्रिकाधारक लाभार्थींना मोफत धान्य वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत १० जुलै रोजी देण्यात आलेल्या आदेशानुसार राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत पात्र लाभार्थींसाठी जुलै ते सप्टेबर या कालावधीत मोफत धान्य वितरित करण्याकरिता अन्नधान्याचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये राज्यातील प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना प्रतिमहा प्रत्येक लाभार्थीला ३ किलो गहू आणि २ कलो तांदळाचे मोेफत वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील गरीब शिधापत्रिकाधारकांना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत तांदळासोबतच आता गहू मोफत मिळणार आहे.सात कोटी लाभार्थींना मिळणार मोफत धान्याचा लाभ!राज्यातील प्राधान्य गट व अंत्योदय अन्न योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक ७ कोटी १६ हजार ३७९ लाभार्थींना प्रत्येकी ३ किलो गहू व २ किलो तांदूळ इत्यादी अन्नधान्याचा मोफत लाभ मिळणार आहे. त्यामध्ये प्राधान्य गटातील ५ कोटी ९२ लाख १६ हजार ३१ लाभार्थी आणि अंत्योदय अन्न योजनेतील १ कोटी ८० हजार ३४८ लाभार्थींचा समावेश आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत प्राधान्य गट आणि अंत्योदय अन्न योजनेंतर्गत जिल्ह्यातील १२ लाख ६३ हजार ५९४ लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येकी ३ किलो गहू व २ किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.- बी.यू. काळेजिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या