शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे ‘एचआयव्ही’ तपासणी शून्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 10:27 IST

अकोला : गत काही वर्षात लोकांमध्ये ‘एचआयव्ही’बद्दल जनजागृती झाल्याने अनेक जण स्वत:हून एचआयव्ही तपासणीसाठी एआरटी केंद्रावर जाऊ लागले. त्यामुळे ...

अकोला : गत काही वर्षात लोकांमध्ये ‘एचआयव्ही’बद्दल जनजागृती झाल्याने अनेक जण स्वत:हून एचआयव्ही तपासणीसाठी एआरटी केंद्रावर जाऊ लागले. त्यामुळे तपासण्यांचे प्रमाणही वाढले; परंतु कोरोनामुळे अनेकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्याचा विपरीत परिमाम एचआयव्हीच्या तपासण्यांवरही झाला आहे. गत तीन महिन्यात केवळ गर्भवतींच्या नियमित एचआयव्ही तपासण्या झाल्यात, तर स्वत:हून येणाऱ्या रुग्णांची संख्या खूपच कमी झाली आहे.कोरोनाच्या भीतीमुळे शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या केवळ दहा टक्क्यांवर आली आहे. इतर रुग्णांसोतच कोरोनाची ही भीती एचआयव्ही तपासणीसाठी एआरटी सेंटरवर जाणाऱ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळेच गत वर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिल ते जून या कालावधीत एचआयव्ही तपासणीसाठी येणाºया रुग्णांची संख्या खूपच कमी झाल्याची माहिती एआरटी सेंटरवरील अधिकाºयांनी दिली. शिवाय, या वातावरणात सामूहिक जनजागृतीवरदेखील परिणाम झाल्याने अनेकांनी स्वत:हून एचआयव्हीची तपासणी करण्यास टाळल्याचे वास्तव आहे.

जनजागृती कार्यक्रमही ठप्प!शाळा, महाविद्यालयात आरोग्य यंत्रणेमार्फत एचआयव्ही संदर्भात जनजागृती मोहीम राबविली जाते. शिवाय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्याही एचआयव्ही चाचण्या केल्या जातात; परंतु कोरोनाच्या फैलावामुळे या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक जनजागृती कार्यक्रमदेखील ठप्प पडले आहेत.

परजिल्ह्यातून येणाºयांचे प्रमाणही घटलेएचआयव्हीच्या तपासणीसाठी वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील बहुतांश लोक अकोल्यात यायचे; परंतु लॉकडाऊनमुळे अशा लोकांचे तपासणीसाठी येण्याचे प्रमाणही घटले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाHIV-AIDSएड्सcorona virusकोरोना वायरस बातम्या