शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Corona Cases : आणखी दोघांचा मृत्यू, २०३ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 17:09 IST

CoronaVirus in Akola : ५ एप्रिल रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४७२ झाला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून,सोमवार, ५ एप्रिल रोजी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४७२ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ११९, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ८४ अशा एकूण २०३ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने आतापर्यंत कोरोनाबाधित होणाऱ्याची संख्या २९,०३४ वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,१२७ अहवाल प्राप्त झाले. यांपैकी ११९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,००८ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये पातूर येथील १८, बाळापूर येथील १२, तेल्हारा व डाबकी रोड येथील प्रत्येकी सहा, पतखेड ता.बार्शीटाकळी येथील पाच, जठारपेठ व पारस येथील प्रत्येकी चार, अकोट येथील तीन, टिटवा ता.बार्शीटाकळी, भगीरथ नगर, खडकी, गोरक्षण रोड, मोठी उमरी, जीएमसी, सुधीर कॉलनी, सोपीनाथ व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, सुकळी ता.बार्शीटाकळी, कान्हेरी सरप ता.बार्शीटाकळी, सहित ता.बार्शीटाकळी, मुर्तिजापूर, जूने शहर, हातरुण ता.बाळापूर, मालेगाव बाजार, रुईखेड, शिवपूर, मुकूंद नगर, ग्रामपंचायत अकोला, खदान, अयोध्या नगर, लोनी, शिवार, शंकर नगर, रामदासपेठ, तापडीया नगर, देशमुख फैल, एमआयडीसी, नायगाव, मंगलवारा, जवाहर नगर, भौरद, चोहट्टा बाजार, संताजी नगर, खोलेश्वर, चांदुर, शिवचरण पेठ, गाडगे नगर, सहकार नगर, कपिला नगर, कुरुम, बार्शीटाकळी, जैन चौक, शांती नगर, अडगाव ता.अकोट, सिंधी कॅम्प, पंचशिल नगर, गाडेगाव ता.पातूर, मलकापूर, केळकर हॉस्पीटल, म्हैसपूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

दोन पुरुषांचा मृत्यू

गोलखेडी ता.मुर्तिजापूर येथील ७१ वर्षीय पुरुष व एळवन ता.बार्शीटाकळी येथील ४९ वर्षीय पुरुष अशा दोघांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांनाही अनुक्रमे २९ मार्च व २ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते.ॲक्टिव्ह रुग्ण

 

४,५३७ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २९,०३४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांपैकी तब्बल २४,०२५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४७० जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४,५३७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला