शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने आई-वडील गमावलेल्या दहा मुलांना हॉटेल मालकाने घेतले दत्तक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:14 IST

कोरोनाकाळात आईवडिलांचे छत्र हरविलेल्या बाळापूर तालुक्यातील दहा मुलांच्या पालनपोषणाची मोठी जबाबदारी घेणारे मुरलीधर राऊत यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या ...

कोरोनाकाळात आईवडिलांचे छत्र हरविलेल्या बाळापूर तालुक्यातील दहा मुलांच्या पालनपोषणाची मोठी जबाबदारी घेणारे मुरलीधर राऊत यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या मित्रांनी एक कार्यक्रम घेत, सन्मानपूर्वक या मुलांना एक हजार रुपयांचा धनादेश दिला. पारस फाट्यावरील त्यांचे हॉटेल वेगवेगळ्या उपक्रमांनी नेहमीच चर्चेत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ‘मन की बात’मधून त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले होते. मागील वर्षी लॉकडाऊन काळात मुरलीधर राऊत यांनी परराज्यात पायी जाणाऱ्यांना मोफत पोटभर जेवण दिले. त्यानंतर अनाथ मुलांसह आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलींचे स्वखर्चाने लग्न लावून सामाजिक बांधिलकी जपली. मुरलीधर राऊत यांनी सामाजिक दायित्व समजून आपलेही समाजाला काही देणे आहे, ही जाण ठेवली. कोरोनामुळे आई-वडील गमावलेल्या मुलांच्या मदतीसाठी ते समोर आले आहेत. त्यांचे कार्य पाहून, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक पी.टी. पाटील, मनोहर बचाटे यांनीसुद्धा दोन मुलांना २० वर्षांसाठी दत्तक घेत, त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

फोटो:

यांच्या उपस्थितीत स्वीकारली जबाबदारी

शेळद फाटा बाळापूर येथे गुरुवारी झालेल्या कार्यक्रमात प्रदेश काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, बाळापूर तालुका खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष किशोरचंद्र गुजराथी, बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सेवकाराम ताथोड, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाश्रम मोझरीचे सदस्य भानुदास कराळे, टिकार महाराज, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, शिवसंग्रामचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील, बँकेचे संचालक राजेश पाटील राऊत, शेळदचे सरपंच सागर उपर्वट, पत्रकार रमेेश ठाकरे, राजेश दिवनाले, गुलाबराव हागे पाटील यांच्या उपस्थितीत मुरलीधर राऊत, मनोहर बचाटे, पी.टी. पाटील यांनी दहा मुलांच्या पालनपोषणासह शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली.

यांचा एक पाल्य दत्तक घेण्याचा संकल्प

मुरलीधर राऊत यांच्या उपक्रमाचे कौतुक होत असून, गोरगरीब व संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाण्यासाठी पुढील आयुष्य खर्ची घालण्याचा संकल्प केला असल्याचे मुरलीधर राऊत यांनी सांगितले. राऊत यांच्या उपक्रमात प्रत्येकी एक पाल्य दत्तक घेण्याचा संकल्प पंचायत समितीचे माजी सदस्य मनोहरराव बचाटे व सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक पी.टी. पाटील यांनी जाहीर केला.