शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयातूनच निकाली निघेल बांधकामाचा तिढा!

By admin | Updated: December 4, 2014 01:33 IST

अकोला महापालिका अधिकारी, पदाधिकारी व बिल्डरांचा सूर.

अकोला: शहरातील निर्माणाधिन इमारतींचे बांधकाम मंजूर नकाशापेक्षा जास्त असल्याची सबब पुढे करीत बांधकाम बंद करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाने दिले. बांधकाम नियमानुसार करायचे असल्यास चटई निर्देशांक (एफएसआय) पुरेसा नसल्याची बांधकाम व्यावसायिकांची ओरड आहे, तर जोपर्यंत एफएसआयच्या मुद्यावर शासन निर्णय घेत नाही, तोपर्यंत अनधिकृत बांधकामांना थारा देणार नसल्याचे प्रशासनाचे मत आहे. अशावेळी अधिकारी, पदाधिकारी व बांधकाम व्यावसायिकांनी समन्वयातून मनपाच्या धर्तीवर हार्डशिप अँन्ड क म्पाऊंडिंगची नियमावली लागू केल्यास बांधकामाचा तिढा निकाली निघण्यासोबतच मनपाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होऊ शकते, असा सूर ह्यलोकमतह्णने आयोजित केलेल्या परिचर्चेत बुधवारी उमटला. महापालिका क्षेत्रातील इमारतींचे बांधकाम मंजूर नकाशानुसार होत नसल्याने आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी तब्बल १८७ निर्माणाधिन इमारतींचे बांधकाम बंद करण्याचे आदेश जारी केले. तसेच नियमांची पुर्तता केल्यानंतरच बांधकामाचा नकाशा मंजूर करण्याचे निर्देश नगर रचना विभागाला दिले. अवघ्या ६00 चौरस फूट जागेवर बांधकाम करायचे असल्यास जागेच्या सरकारी मोजणीचा अहवाल, तीस वर्षांतील खरेदी-विक्रीची फेरफार प्रक्रिया सादर करण्याचे नियम लागू करण्यात आले. ही बाब बांधकाम व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक ठरू लागली आहे. मुळात इमारत बांधकामासाठी एक एफएसआय पुरेसा नसल्याने काहीअंशी इमारतीचे बांधकाम जास्त होते. अर्थातच, एफएसआय वाढवून देणे प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. अन्यथा सर्वसामान्य नागरिकांच्या घराचे स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकणार नाही, असा बांधकाम व्यावसायिकांचा दावा असून, त्यामध्ये तथ्यसुद्धा आहे. मंजूर नकाशापेक्षा जास्त बांधकाम होत असेल तर बांधकाम बंद करणे किंवा इमारत पाडणे, हा या समस्येवरील पर्याय होऊ शकत नाही. त्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करणे, किंवा मनपाच्या धर्तीवर स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण नियमावली मंजूर करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलण्याची आवश्यकता असल्याचे मत मनपा पदाधिकारी व क्रे डाईच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले.