शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या कर्जाचे रूपांतरण लवकरच

By admin | Updated: December 4, 2014 01:45 IST

अकोला जिल्ह्यातील १ लाख ११ हजारांवर शेतक-यांना मिळणार लाभ.

संतोष येलकर / अकोलाअल्प पाऊस, हातून गेलेली पिके आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत, जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी लागू करण्यात आलेल्या सवलतींमध्येखरीप हंगामात शेतकर्‍यांनी घेतलेल्या पीक कर्जांचे रूपांतरण लवकरच करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ३९0 शेतकर्‍यांना या सवलतीचा लाभ मिळणार आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात तब्बल दीड महिना विलंबाने पावसाने हजेरी लावली. त्यातही अत्यल्प पाऊस झाल्याने, खरीप हंगामात मूग, उडिदाचे पीक शेतकर्‍यांच्या हातून गेले. सोयाबीन पिकाचे उत्पादनही अत्यल्प झाले असून, काही शेतकर्‍यांना दुबार-तिबार पेरणी करूनही पेरणीचा खर्चही हाती आला नाही. पावसाअभावी जमिनीतील ओल खोल गेल्याने, रब्बी पिकांचेही खरे नाही. पिके हातून गेल्याच्या स्थितीत जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केलेल्या जिल्ह्यातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी ४१ पैसे आहे. शासन निर्णयानुसार खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैसेपेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यातील टंचाईग्रस्त ९९७ गावांमध्ये सहकारी कर्जाचे रूपांतरण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगितीसह विविध सवलती लागू करण्यात आल्या असून, या सवलती जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये तातडीने उपलब्ध करून देण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील सर्वच विभागाच्या अधिकार्‍यांना १ डिसेंबर रोजी दिला. त्यानुसार यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी विविध बँकांडून काढलेल्या पीक कर्जाचे रूपांतरण लवकरच होणार आहे. त्यानुषंगाने शेतकर्‍यांच्या कर्जाचे रूपांतरण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा सहकारी बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांची माहिती मागविण्यात आली आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात विविध बँकांकडून पीक कर्ज घेतलेल्या जिल्ह्यातील १ लाख ११ हजार ३९0 शेतकर्‍यांना कर्ज रूपांतरण या सवलतीचा लाभ मिळणार आहे.