शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमीयुगुल-पीकेव्हीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:02 IST

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये शनिवारी  रात्री धुडगूस घालणार्‍या काही युवतींसह त्यांचे मित्र व  पीकेव्हीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. सदर  प्रकरण एमआयडीसी पोलिसांपर्यंत गेले, मात्र यशस्वी मध्यस्थी  केल्यानंतर हे प्रकरण आपसात मिटविण्यात आले.

ठळक मुद्देसदर  प्रकरण एमआयडीसी पोलिसांपर्यंत गेलेयशस्वी मध्यस्थीनंतर प्रकरण आपसात मिटविण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये शनिवारी  रात्री धुडगूस घालणार्‍या काही युवतींसह त्यांचे मित्र व  पीकेव्हीच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. सदर  प्रकरण एमआयडीसी पोलिसांपर्यंत गेले, मात्र यशस्वी मध्यस्थी  केल्यानंतर हे प्रकरण आपसात मिटविण्यात आले.दसर्‍याच्या रात्री काही युवक-युवती पीकेव्हीच्या जंगलामध्ये  फिरण्यासाठी गेले होते. रात्री उशीर झालेला असतानाही या  युवक-युवतींचा या परिसरात धुडगूस सुरूच असल्याची माहिती  मिळाल्यानंतर काही विद्यार्थी त्यांना बाहेर काढण्यासाठी गेले,  याच कारणावरून युवक-युवती व विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला.  त्यानंतर सदर प्रकरण एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहोचले,  पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू  केली. मात्र, ठाणेदार किशोर शेळके व पोलिसांनी युवक-युवती  आणि विद्यार्थ्यांची समजूत घातल्यानंतर हे प्रकरण आपसात  मिटविण्यात आल्याची माहिती ठाणेदार शेळके यांनी दिली.-नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारा गजाआडअकोला : बेरोजगार युवकांना नोकरीचे आमिष देत, तसेच  त्यांना नोकरीचे बनावट कॉल लेटर देणार्‍या टोळीतील म्होर क्यास सिव्हिल लाइन्स पोलिसांनी रविवारी अटक केली.  शुद्धोधन तायडे, असे आरोपीचे नाव असून, तो अमरावती ये थील रहिवासी असल्याची माहिती आहे.अकोल्यातील सचिन कुरई, धनंजय दांदळे या दोघांसह आणखी  एका बेरोजगार युवकास अमरावती तसेच यवतमाळ येथील  रहिवासी सागर गोक्टे व म्होरक्या शुद्धोधन तायडे या दोघांनी  नोकरीचे आमिष देऊन, पैसे मागितले होते. या दोघांच्या  आमिषाला बळी पडत सचिन कुरई दांदळे यांनी रोकडही दिली  होती. त्यानंतर शुद्धोधन तायडे व गोक्टे यांनी या बेरोजगार  युवकांना नोकरीचे बनावट कॉल लेटर पाठवून उर्वरित रक्कम  मागितली. मात्र, या बेरोजगार युवकांना फसवणूक झाल्याचे  लक्षात येताच त्यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार  दिली. पोलिसांनी गुन्हे दाखल करून या प्रकरणातील आरोपी  अमोल गोक्टे याला अटक केली, त्यानंतर अमरावती येथील  शुद्धोधन तायडे याच्या घरी जाऊन बनावट शिक्के व धनादेश जप्त  करण्यात आले होते. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शुद्धोधन  तायडे याला पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. सोमवारी  त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. ही कारवाई  ठाणेदार अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनात सिव्हिल लाइन्स  पोलिसांनी केली.