शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदाराला जीवे मारण्याची धमकी

By admin | Updated: July 9, 2017 09:33 IST

डुकरे पकडणार्‍यांना खोलेश्‍वर भागात जमावाकडून धक्काबुक्की; पोलिसात तक्रार.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरात मोकाट डुकरे पकडण्यासाठी मध्यप्रदेशातून आलेल्या कंत्राटदारासह कर्मचार्‍यांना स्थानिक वराह पालकांनी धक्काबुक्की करीत त्यांना जीवे मारण्याची धमक्या दिल्याचा प्रकार शनिवारी दुपारी खोलेश्‍वर परिसरात घडला. याप्रकरणी मनपा प्रशासनाच्यावतीने सिटी कोतवाली पोलिसांत तक्रार देण्यात आली. शहरात मोकाट डुकरांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी यासंदर्भात मनपाच्या सभागृहात ठराव पारित केला. शहरात वराह पालनाचा व्यवसाय करणारे मनपाच्या आस्थापनेवर सफाई कर्मचारी पदावर कार्यरत आहेत. संबंधित वराह पालकांनी डुकरांची शहराबाहेर विल्हेवाट लावावी, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. त्यानंतर तीन वेळा डुकरे पकडण्याची निविदा प्रकाशित केली. वराह पालकांच्या दबावामुळे कोणीही निविदा सादर केली नाही. अखेर एका कंत्राटदाराच्या माध्यमातून मध्यप्रदेश येथील वीस जणांची चमू आणण्यात आली. शनिवारी सकाळी महापौर विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत प्रभाग ५ मध्ये डुकरे पकडण्याची मोहीम सुरू झाली. दुपारी १२ वाजता खोलेश्‍वर भागात ही मोहीम सुरू असताना खदान, कैलास नगर, बापू नगर आदी भागातून आलेल्या ५0 ते ६0 जणांनी महापालिकेच्या मोहिमेला आडकाठी निर्माण करीत कंत्राटदाराला धक्काबुक्की केली तसेच धारदार शस्त्रे दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार कोंडवाडा विभाग प्रमुख सुरेश अंभोरे, आरोग्य निरीक्षकांसह दोन पोलीस कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत घडला, हे विशेष. परिणामी डुकरे पकडण्याची मोहीम थांबवावी लागली. दरम्यान, कंत्राटदाराला धक्काबुक्की होत असताना सहायक आरोग्य अधिकारी अब्दुल मतीन जागेवरून अचानक रफूचक्कर झाले होते. शहरात १७ हजार डुकरांचा सुळसुळाटशहरात तब्बल १७ हजारपेक्षा अधिक डुकरांचा सुळसुळाट आहे. एका डुकराचे वजन ४0 ते ५0 किलो होताच त्यांची १00 रुपये किलोप्रमाणे ४ हजार रुपयांत विक्री केली जाते. एका ट्रकमधून किमान १00 डुकरे म्हणजेच चार लाख रुपये किमतीच्या डुकरांची ने-आण केली जाते. एकूणच शहरात एक-दोन नव्हे तर चक्क ६ कोटी रुपये किमतीची डुकरे मुक्तसंचार करीत असल्याचे जाणकारांचे मत आहे. या व्यवसायावर कोणताही खर्च होत नसल्याने वराह पालकांची वर्षभरात लाखो रुपयांची कमाई होते. नगरसेवकांची अनुपस्थिती खटकली!मनपाच्या सभागृहात नगरसेवक अजय शर्मा यांनी डुकराचे पिल्लू सोडले होते. सर्वपक्षीय नगरसेवकांनी डुकरे पकडण्याचा ठराव पारित केला होता. खोलेश्‍वर भागात कंत्राटदाराला धक्काबुक्की व शिवीगाळ होत असताना संबंधित नगरसेवकांची अनुपस्थिती अनेकांना खटकली.