शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मानधनावरील कर्मचा-यांचे कंत्राट होणार रद्द

By admin | Updated: November 23, 2014 01:27 IST

अकोला मनपा उपायुक्त चिंचोलीकरांचा निर्णय.

अकोला: महापालिकेत कार्यरत १६९ कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मानधनाचा कालावधी सहा महिन्यांनी वाढवून देण्याचा निर्णय प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर यांनी १३ नोव्हेंबर रोजी घेतला; मात्र अनेक कर्मचारी बिनकामाचे असल्याचा साक्षात्कार उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांना झाल्यामुळे अशा कर्मचार्‍यांना मुदतवाढ न देता, घरी पाठविण्याचा निर्णय उपायुक्तांनी घेतल्याची माहिती आहे. उपायुक्तांच्या भूमिकेमुळे अद्यापपर्यंत कंत्राटी कर्मचार्‍यांना कार्यादेश मिळाले नसून, फाईल स्वाक्षरीविना पडून असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेत मानधन तत्त्वावर १६९ कर्मचारी कार्यरत आहेत. जलप्रदाय विभाग, नगर रचना, बांधकाम, अतिक्रमण विभागात महत्त्वाच्या पदांवर कंत्राटी अभियंता सेवा बजावत आहेत. कंत्राटी कर्मचार्‍यांच्या मुदतवाढीसंदर्भात प्रशासनाची भूमिका स्पष्ट नसल्याने अनेकदा मुदतवाढ देताना प्रशासनाकडून हात आखडता घेतला जातो. शिवाय सहा-सहा महिन्यांचे वेतनसुद्धा दिल्या जात नाही. आस्थापनेवरील कर्मचार्‍यांसह मानधनावरील कर्मचार्‍यांच्या वेतनाची समस्या निकाली काढण्यास प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र आहे. ऑगस्ट २0१४ मध्ये मानधनावरील कर्मचार्‍यांना सरळ मुदतवाढ न देता, प्रशासनाने भिजत घोंगडे कायम ठेवले. प्रशासनाची भूमिका लक्षात घेता, मध्यंतरी २३ कंत्राटी अभियंत्यांनी वेतनवाढीची मागणी करीत जलप्रदाय विभागातील अभियंत्यांनी काम बंद केले होते. सर्वपक्षीय नगरसेवकांनी हा मुद्दा प्रभारी आयुक्त शिवाजी दिवेकर यांच्यासमोर मांडल्यावर १३ नोव्हेंबर रोजी संपूर्ण १६९ कंत्राटी कर्मचार्‍यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. उपायुक्त दयानंद चिंचोलीकरांनी मात्र यामधून तिसरा पाय काढत, १६९ कर्मचार्‍यांमधून बिनकामाच्या कर्मचार्‍यांना घरी पाठविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यामुळे अद्यापपर्यंतही संबंधित कर्मचार्‍यांना कार्यादेश देण्यात आले नसून, स्वाक्षरीविना फाईल मनपात पडून आहे.