शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला मनपा कर्मचा-यांचा संप मिटला

By admin | Updated: January 29, 2015 01:21 IST

शिवसेनेची शिष्टाई; पूर्ण वेतन न मिळाल्यास पुन्हा काम बंद करण्याचा कर्मचा-यांचा इशारा.

अकोला: महापालिका कर्मचार्‍यांचे सहा दिवसांपासून सुरू असलेले कामबंद आंदोलन बुधवारी स्थगित करण्यात आले. आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि शिवसेनेच्या शिष्टाईनंतर प्रशासनाने दिलेल्या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवत कर्मचारी संघटनेने आंदोलन स्थगित केले असले तरी वेतनाची पूर्ण रक्कम न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी प्रशासनाला दिला आहे. सहा महिन्यांच्या थकीत वेतनासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मनपा कर्मचारी संघर्ष समितीने २३ जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले होते. संघर्ष समितीने प्रशासनाला ४५ दिवसांपूर्वी आंदोलनाची नोटीस दिल्यानंतरही प्रशासनासह सत्ताधार्‍यांनी या कालावधीत समेट न घडवल्याने कर्मचार्‍यांमध्ये संतापाची लाट होती. मनपाच्या तिजोरीत २१ कोटी रुपये जमा असताना जमा रकमेबाबत पालकमंत्र्यांसह प्रभारी आयुक्तांची लेखा विभागाकडून दिशाभूल करण्यात आली. तिजोरीत अवघे १६ कोटी रुपये असल्याने कर्मचार्‍यांना दोन महिन्यांचे वेतन अदा करण्याची भूमिका प्रभारी आयुक्तांसह पदाधिकार्‍यांनी घेतली होती. अखेर संपाच्या सहाव्या दिवशी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी पुढाकार घेत प्रशासन व कर्मचार्‍यांमध्ये शिष्टाई घडवून आणली. प्रभारी आयुक्त दिवेकर यांच्या दालनात बाजोरिया यांनी २१ कोटींतून कर्मचार्‍यांचे तीन महिन्यांचे वेतन, सेवानवृत्ती वेतनासह पाचव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम अदा करणे प्रशासनाला शक्य असल्याचे सुचित केले. आमदारांच्या प्रस्तावाला प्रभारी आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर संघर्ष समितीने संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

**अकोला मनपा शिक्षकांचे आंदोलन मात्र सुरूच

सहा महिन्यांचे वेतन थकीत असताना दोन महिन्यांचे वेतन अदा करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव फेटाळून लावत मनपा शिक्षकांनी आंदोलन कायम ठेवत असल्याचे बुधवारी स्पष्ट केले. मनपा कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा निघाला असला, तरी आगामी दिवसात शिक्षकांच्या आंदोलनाला पुन्हा सुरुवात होणार असल्याचे संकेत आहेत.