शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:19 IST

अकोला : जागतिक ग्राहक दिनानिमित्त पुरवठा विभागाच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात ‘जागतिक ग्राहक दिन’ ऑनलाईन वेबीनारव्दारे साजरा करण्यात आला. ...

अकोला : जागतिक ग्राहक दिनानिमित्त पुरवठा विभागाच्यावतीने अप्पर जिल्हाधिकारी यांच्या दालनात ‘जागतिक ग्राहक दिन’ ऑनलाईन वेबीनारव्दारे साजरा करण्यात आला. ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी ग्राहक न्यायमंचाची स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे ग्राहकांना न्याय मिळवून दिला जातो. तथापि ग्राहकांनीही आपल्या हक्कांबाबत जागरूक रहावे व अन्यायकारक व्यापार पद्धतीस बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष श्रीमती एस. एम. उंटवाले यांनी केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा पुरवठा अधिकारी बाबासाहेब गाढवे, जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले, ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्ष श्रीमती एस. एम. उंटवाले, राष्ट्रीय ग्राहक संरक्षण संघाचे अध्यक्ष संजय पाठक तसेच जिल्ह्यातील गॅस एजन्सी, सहायक आयुक्त अन्न व प्रशासन, वजन मापे निरीक्षक, वीज वितरण कंपनी व तसेच सर्व निरीक्षण अधिकारी आदी उपस्थित होते.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक ग्राहक दिन ऑनलाईन वेबिनारव्दारे घेण्यात आला. यावेळी श्रीमती एस. एम. उंटवाले यांनी ग्राहक संरक्षण कायदा २०१९ च्या सुधारित कायद्यातील तरतुदीच्या अनुषंगाने ग्राहकांच्या हक्कांना प्रोत्साहन, संरक्षण देऊन ग्राहक संरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन, तपासणी, तक्रारी, खटला चालविणे, असुरक्षित वस्तू व सेवा परत मागविणे, अन्यायकारक व्यापार पद्धती बंद करणे व दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर दंड आकारणे आदींच्या अधिकाराबाबत मार्गदर्शन केले. तसेच ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत येणाऱ्या खटल्यांबाबत जिल्हा, राज्य व केंद्र यांच्याकडे असणारे खटले चालवण्यासंदर्भातील वित्तीय अधिकाराची जाणीव करून दिली. ग्राहकांना न्याय मिळविण्यासाठी खटले सर्वोच्च न्यायालयातसुद्धा चालवू शकतात याची माहिती दिली.

संचालन शीतल मोरखडे यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी केले. आभार प्रदर्शन अन्नधान्य वितरण अधिकारी बी. डी. अरखराव यांनी केले.