लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यातील बांधकाम व्यवसायी अमित वाघ त्यांच्या कुटुंबीयांसह साताऱ्यातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांची पत्नी प्रियंका व दोन मुले स्पंदन व शाश्वत बेपत्ता झाले असून, सातारा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अमित वाघ यांचे संपूर्ण कुटुंबीय अशाप्रकारे अचानकच बेपत्ता झाल्याने बांधकाम व्यवसायाच्या स्पर्धेतून हा प्रकार घडल्याची माहिती आहे.अकोल्यातील खडकी येथील संतोषनगरात राहणारे तथा प्रसिद्ध बांधकाम व्यवसायी अमित भरत वाघ (३५), त्यांची पत्नी प्रियंका अमित वाघ (२९) आणि मुले स्पंदन (०६), शाश्वत (०३) हे सातारा येथे १३ जूनच्या पूर्वी सुट्यांमध्ये गेले होते. सातारा ही अमित वाघ यांची सासरवाडी असल्याची माहिती आहे. १३ जूनच्या रात्रींपासून अमित वाघ आणि त्यांचे कुटुंबीय अचानक बेपत्ता झाले असून, त्यांचा सातारा पोलीस कसून शोध घेत आहेत. अमित वाघ यांची पत्नी आणि दोन मुलेही बेपत्ता झाली असून, त्यांच्या बेपत्ता होण्यामागे बांधकाम व्यवसायातील स्पर्धा असल्याचे बोलल्या जात आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस बांधकाम व्यवसायी अमित वाघ यांचा शोध घेण्यासाठी अकोल्यातही येऊन गेल्याची विश्वसनीय माहिती असून, अद्याप त्यांच्या हातात कुठलीही माहिती लागली नाही. अमित वाघ हे बांधकाम व्यवसायात काही भागीदारांसोबत व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे. वाघ यांचे गोरक्षण रोड, मलकापूर, तुकाराम हॉस्पिटल चौकामध्ये मोठ-मोठी अपार्टमेंटचे बांधकाम सुरू असून, काही बांधकाम पूर्णत्वास गेलेली आहेत. ते अशाप्रकारचे अचानक बेपत्ता झाल्याने विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.स्पर्धेतून काटा काढल्याची चर्चाअमित वाघ यांचा बांधकाम व्यवसाय चांगला होता. त्यामुळे या स्पर्धेतूनच त्यांचा काटा काढण्यात आल्याची चर्चा गत तीन दिवसांपासून पोलीस वर्तुळात सुरू आहे. एवढेच नव्हे, तर बांधकाम व्यावसायिकांमध्येही ही चर्चा असून, अमित वाघ बेपत्ता होण्यामागे त्यांचेच काही स्पर्धक असल्याचे बोलले जात आहे. भागीदारीतील व्यवसाय वांध्यातअमित वाघ यांचा भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय होता. भागीदारीतील हा व्यवसाय वांध्यातही आल्याची माहिती आहे. त्यामुळे वाघ यांनी स्वतंत्रपणे बांधकाम व्यवसाय उभारण्याचे प्रयत्न केले होते आणि त्यामध्ये ते यशस्वीही झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
बांधकाम व्यावसायिक अमित वाघ कुटुंबीयांसह बेपत्ता
By admin | Updated: June 29, 2017 00:56 IST