शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे मार्गावर निर्माणाधीन तीन पुलांच्या निविदा उघडणार २९ ला

By admin | Updated: February 25, 2016 01:35 IST

गेज परिवर्तनाच्या दिशेने दक्षिण मध्य रेल्वेचे पाऊल पडते पुढे.

राम देशपांडे / अकोलामेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रातून जाणार्‍या दक्षिण मध्य रेल्वेच्या गेज परिवर्तनास अद्याप केंद्र व राज्याच्या वन विभागाची परवानगी मिळाली नसली तरी अकोला ते आकोट दरम्यानचे कार्य प्रगतिपथावर आहे. या प्रक्रियेत रेल्वे प्रशासनाला अकोला-आकोट दरम्यान तीन मोठे पूल उभारण्याची गरज भासणार आहे. निर्माणाधीन असलेल्या या तीन पुलांसाठी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने ई-निविदा पद्धतीने २८ जानेवारी रोजी प्रस्ताव आमंत्रित केले होते. सोमवार, २९ फेब्रुवारी रोजी ते उघडण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित क्षेत्रातून जाणार्‍या दक्षिण मध्य रेल्वेच्या गेज परिवर्तनास अद्याप केंद्र व राज्य वन विभागाची परवानगी मिळाली नसली तरी अकोला ते आकोट दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे गेज परिवर्तन करण्यास दक्षिण मध्य रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. जमीन अधिग्रहणापोटी २९ कोटी महसूल विभागास दिल्यानंतर, या प्रकल्पासाठी यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात पुरेसा निधी मंजूर होणारच, या आशेवर दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने २८ जानेवारी २0१६ रोजी ई-निविदा पद्धतीने अकोला ते आकोट दरम्यान रेल्वे मार्गावर निर्माणाधीन असलेल्या तीन मोठय़ा पुलांसाठी प्रस्ताव मागविले. २0 कोटी ८३ लाख ५९ हजारांच्या या कामासाठी सिकंदराबाद, बंगळुरु व इतर ठिकाणच्या बांधकाम कंपन्यांनी दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनास ई-निविदेद्वारे प्रस्ताव सादर केले आहेत. हे प्रस्ताव सोमवार, २९ फेब्रुवारी रोजी उघडण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी दिली. अकोला-खंडवा मीटरगेज रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, यासाठी खा. संजय धोत्रे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे साकडे घातले तसेच हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी वन विभागानेसुद्धा सकारात्मक दृष्टिकोनातून पावले उचलावी, अशी अपेक्षा त्यांनी केंद्रीय वनअधिकार्‍यांकडे व्यक्त केली.