अकोला - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या दुरूस्तीचे काम करण्यात येत असल्याने मागील पाच ते सहा महिन्यांपासून शस्त्रक्रिया विभाग बंद आहे. शस्त्रक्रिया विभाग मार्च महिन्यापासून केवळ नावालाच सुरू आहे. गंभीर आजारी रुग्णाची एखादी शस्त्रक्रिया करण्यात येत आहे, मात्र इतर रुग्णांकडे टाळाटाळ करण्यात येत आहे. गंभीर आजारी रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात येत असल्या तरी इतर शेकडो रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दोन महिने त्रास सहन करण्याचा सल्लाही येथील डॉक्टर देत असल्याने रुग्णांचा जीव एका आरोग्य संस्थेतच किती स्वस्त झालाय, हे दिसून येत आहे. देखभाल दुरुस्तीची कामेही थंडबस्त्यात सुरू असल्याने या रुग्णांना पावसाळय़ात त्रास सहन करावा लागत आहे. अँपेंडिक्स, पोटातील गोळा, अल्सर, हर्निया यासारख्या आजारांच्या शस्त्रक्रिया रखडल्या असून, त्यांना दोन ते तीन महिन्यांनंतरची तारीख देण्यात येत आहे. तारखांच्या घोळात रुग्णांचे आजार मात्र वाढत असून, त्यांना शारीरिक त्रासासोबतच आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे.
शस्त्रक्रिया विभागाचे बांधकाम संथगतीने
By admin | Updated: September 10, 2014 01:26 IST