शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन’मध्ये पोलीस वसाहतीच्या इमारतीचे बांधकाम सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 10:50 IST

‘लॉकडाऊन’च्या काळात परप्रांतीय मजुरांकडून पोलीस वसाहतीच्या शासकीय इमारतीचे बांधकाम सुरूच आहे.

- संजय खांडेकरअकोला : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वत्र ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. अकोल्यातील बांधकाम कंत्राटदाराकडून मात्र ‘लॉकडाऊन’चे राजरोस उल्लंघन होत आहे. ‘लॉकडाऊन’च्या काळात परप्रांतीय मजुरांकडून पोलीस वसाहतीच्या शासकीय इमारतीचे बांधकाम सुरूच आहे. विशेष म्हणजे हे बांधकाम सुरू असताना कोणत्याच कामगाराच्या नाकातोंडाला सुरक्षेसाठी मास्क किंवा कापड बांधलेले नाही. हातावर पोट असलेल्या या मजुरांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील लोकांकडून होत आहे. दक्षता नगर पोलीस वसाहतीच्या बाजूला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नवीन टोलेजंग इमारत उभी झाली आहे. या इमारतीचे बांधकाम काही प्रमाणात शिल्लक राहिलेले असताना सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. परप्रातांतून आलेले मजूर अकोल्यातच अडकले. दरम्यान, या मजुरांच्या निवाºयाची आणि उदरनिर्वाहाची जबाबदारी अप्रत्यक्षपणे कंत्राटदारावर आलेली आहे. त्यामुळे कंत्राटदाराने त्यांच्या उदरनिर्वाहाच्या सोयीसह इमारतीच्या आतील भागाचे काम सुरूच ठेवले आहे. येथील बांधकाम २१ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ असतानापासून सुरू आहे. इमारतीच्या आतील भागातील छपाईचे काम सुरू असल्याची माहिती परिसरातील नागरिकांना कळली. कामगारांचे जत्थे असुरक्षित असून, यात मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश आहे. नाकातोंडाला मास्क किंवा कपडे न बांधताच मजूर समूहाने येथे काम करीत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा येथे फज्जा उडत आहे. परिसरातील नागरिकांनी ही बाब लोकमत बातमीदारांच्या लक्षात आणून दिली. लोकमतने घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता परिसरात आतील भागात काम सुरू असल्याचे दिसून आले. स्थानिक कंत्राटदाराच्या आगाऊपणामुळे गोरगरीब मजुरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. एकीकडे शासकीय यंत्रणा कोरोनासाठी जमावबंदी करीत आहे, तर दुसरीकडे शासकीय इमारतीच्या बांधकामासाठीच मजुरांचा समूह नियमांची पायमल्ली करीत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून या कंत्राटदाराची कानउघाडणी होणे गरजेचे आहे. अन्यथा साथीच्या रोगाने लाखमोलाचा जीव मजूर गमावून बसतील.

 

टॅग्स :Akolaअकोला