शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सरकारी जमीनींवर क्रिडांगण तयार करा

By संतोष येलकर | Updated: August 18, 2023 18:24 IST

जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत सदस्यांची सूचना, अकोला शहरातील जिल्हा परिषद सावित्रीबाइ फुले कन्या शाळेत घेण्यात आलेल्या शिक्षण समितीच्या सभेत जिल्हा परिषद शाळांच्या समस्या आणि अडचणींच्या मुद्दयावरही चर्चा करण्यात आली.

अकोला: जिल्हयातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सरकारी जमीनींवर (इ क्लास ) क्रीडांगण तयार करण्याची सूचना जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत गुरुवारी सदस्यांनी मांडली. त्यानुषंगाने कार्यवाही सुरु करण्याचेही सभेत ठरविण्यात आले.

ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये खेळांविषयी जाणीव जागृतीसह उत्सुकतेची भावना वाढीस लागावी, यासाठी गावांत उपलब्ध ‘इ क्लास ’ जमीनींवर विद्यार्थ्यांसाठी क्रीडांगण तयार करण्यात यावे. संबंधित इ क्लास जमीनीचा सातबारा जिल्हा परिषद शाळेच्या नावाने करण्यात यावा, अशी सूचना राम गव्हाणकर यांनी सभेत मांडली. त्यानुषंगाने यासंदर्भात कार्यवाही करण्याचे सभेत ठरविण्यात आले.

यासोबतच जिल्हयातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थींच्या अडचणी सोडविण्याच्या सोडविण्याच्या दृष्टीने ज्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळांमध्ये महिला शिक्षक नाही, अशा ठिकाणी तातडीने महिला शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणीही गव्हाणकर यांनी सभेत केली. अकोला शहरातील जिल्हा परिषद सावित्रीबाइ फुले कन्या शाळेत घेण्यात आलेल्या शिक्षण समितीच्या सभेत जिल्हा परिषद शाळांच्या समस्या आणि अडचणींच्या मुद्दयावरही चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद शिक्षण सभापती माया नाइक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी, समितीचे सदस्य राम गव्हाणकर, स्फूर्ती गावंडे, वर्षा वझिरे, प्रगती दांदळे, गजानन काकड, डाॅ.गणेश बोबडे, प्रमोद फाळके, शिक्षणाधिकारी डाॅ.सुचिता पाटेकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शाळेत पाणीपुरवठ्याच्या कामासाठी शिक्षण सभापतींनी दिली मानधनाची रक्कमअकोला शहरातील जिल्हा परिषद सावित्रीबाइ फुले कन्या शाळेत बोअरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र या बोअरचे सबमर्सिबल पंप जळाले शाळेतील पाणीपुरवठा बंद पडला. त्यामुळे नवीन सबमर्सिबल पंप बसवून शाळेतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण सभापती माया नाइक यांनी मानधनातून १३ हजार ५५ रुपयांची रक्कम शाळेला दिली. या रकमेचा धनादेश मुख्य कार्यकारी अधिकारी बी.वैष्णवी यांच्या उपस्थितीत शिक्षण समितीच्या सभेत जि.प. सावित्रीबाइ फुले कन्या शाळेच्या मुख्याध्यापिकांना देण्यात आला.