शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

संघटनेपेक्षा सत्तेला महत्त्व दिल्याने काँग्रेस संपली - सरोज पांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 01:28 IST

७0 वर्षांंनंतर भाजपला यश मिळाले. एकेकाळी भाजपला लोक हसायचे. आता ती गत काँग्रेसची झाली आहे. काँग्रेस पार्टी शून्याकडे जात आहे. संघटन आणि सत्ता एकमेकांना पूरक आहेत. भाजप पदाधिकार्‍यांनी सत्तेपेक्षा संघटनेला महत्त्व द्यावे, सत्ता डोक्यात शिरली की कार्यकर्ताही नेता बनतो आणि संघटन थांबते. काँग्रेसने सत्तेला महत्त्व दिले, संघटनेला नाही. त्यामुळेच काँग्रेस पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे. जनता आमच्यासोबत आहे. संघटन आमची शक्ती आहे. संघटनेच्या कार्यपद्धतीनुसारच भाजप पदाधिकार्‍यांनी काम केले पाहिजे. अशा शब्दांत भाजप राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनी भाजप पदाधिकार्‍यांचे कान टोचले. 

ठळक मुद्दे भाजप पदाधिकार्‍यांना कानपिचक्या संघटनेला महत्त्व द्या!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ७0 वर्षांंनंतर भाजपला यश मिळाले. एकेकाळी भाजपला लोक हसायचे. आता ती गत काँग्रेसची झाली आहे. काँग्रेस पार्टी शून्याकडे जात आहे. संघटन आणि सत्ता एकमेकांना पूरक आहेत. भाजप पदाधिकार्‍यांनी सत्तेपेक्षा संघटनेला महत्त्व द्यावे, सत्ता डोक्यात शिरली की कार्यकर्ताही नेता बनतो आणि संघटन थांबते. काँग्रेसने सत्तेला महत्त्व दिले, संघटनेला नाही. त्यामुळेच काँग्रेस पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे. जनता आमच्यासोबत आहे. संघटन आमची शक्ती आहे. संघटनेच्या कार्यपद्धतीनुसारच भाजप पदाधिकार्‍यांनी काम केले पाहिजे. अशा शब्दांत भाजप राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनी भाजप पदाधिकार्‍यांचे कान टोचले. भाजपच्यावतीने शुक्रवारी दुपारी न्यू अग्रसेन भवनात प्रमुख पदाधिकारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर, भाजपचे संघटनमंत्री उपेंद्र कोठीकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, शहराध्यक्ष किशोर मांगटे पाटील, उपमहापौर वैशाली शेळके, अँड. मोतीसिंह मोहता व श्रावण इंगळे आदींची उपस्थिती होती. राष्ट्रीय महासचिव सरोज पांडे यांनी बोलताना, भाजपमध्ये संघटनेला महत्त्व आहे, असे सांगितले. काँग्रेसचे लोक अटलबिहारी वाजपेयी यांची खिल्ली उडवायचे, तेव्हा अटलबिहारी वाजपेयी काँग्रेसच्या नेत्यांना उत्तर देताना, एक दिवस येईल, लोकसुद्धा तुमच्यावर हसतील, असे म्हणायचे. दिवस बदलले.  काँग्रेसला लोक हसत आहेत. कारण सत्ता डोक्यात शिरली, की संघटन मजबूत राहत नाही. संघटन संपल्यामुळे काँग्रेस संपत आहे. असे सांगत, त्यांनी संघटन ही भाजपची शक्ती आहे. त्यामुळे प्रमुख पदाधिकार्‍यांनी सत्तेपेक्षा संघटनेला महत्त्व द्यावे, बुथ, मंडळ मजबूत करण्यावर भर द्यावा, संघटनेत सक्रिय राहून काम करावे, असे आवाहन सरोज पांडे यांनी केले. यावेळी खासदार संजय धोत्रे यांनी राष्ट्रीय महासचिव सरोज पांडे यांचा सत्कार केला. संघटनमंत्री उपेंद्र कोठीकर यांनी सरोज पांडे यांचा संघटनात्मक दौरा असून, बुथ, मंडळ स्तरावर भाजपचे काम कसे सुरू आहे, याचा त्या आढावा घेणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजराव थोरात, किशोर मांगटे पाटील यांनी केले. परिचय प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर यांनी करून दिला. संचालन श्रीकृष्ण मोरखडे यांनी केले. 

अन् पदाधिकार्‍यांना फुटला घाम! भाजपच्या राष्ट्रीय महासचिव सरोज पांडे यांनी शुक्रवारी दबंग स्टाइलने भाजपमधील संघटन कार्याचा आढावा घेतला. त्यांनी शहरासोबतच ग्रामीण भाजपच्या कार्याची माहिती घेत, बूथप्रमुख, मंडळ अध्यक्ष, भाग अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सरचिटणीस यांना थेट प्रश्न विचारून काय काम केले, किती बैठका घेतल्या, कोणते कार्यक्रम राबविले. याबाबत माहिती जाणून घेतली आणि भाजपमध्ये पक्षशिस्तीला महत्त्व आहे. असे सांगत, त्यांनी शहर व ग्रामीण कार्यकारिणीची यादी मागवित, त्यातील किती पदाधिकारी उपस्थित आहेत, किती अनुपस्थित आहेत. हे तपासून पाहिल्यावर, त्यांना अनेक पदाधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत, मंडळ अध्यक्ष, भाग अध्यक्षांना धारेवर धरले आणि हे पदाधिकारी बैठकीला का आले नाहीत. याचा जाब विचारला आणि नेत्यांशी जवळीक असणारे पदे बळकावत असतील, तर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवा. बैठकीला येण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, तर मग त्यांना पदमुक्त करण्याचा आदेशच सरोज पांडे यांनी जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांना दिला. त्यामुळे भाजप पदाधिकारी अस्वस्थ झाले होते. पक्षाची एक शिस्त, कार्यपद्धती आहे. ती पाळल्याच गेली पाहिजे. असे सांगत सरोज पांडे यांनी, जे काम करत नसतील, त्यांना बाहेर काढा. त्यांच्याशिवायही संघटन चालू शकते, असे खडेबोल त्यांनी सुनावले.  संघटनेतील कार्यकर्ते स्वत:ला नेते समजू लागल्यावर संघटन राहत नाही. संघटन कमकुवत झाल्यामुळेच काँग्रेस संपल्याचेही उदाहरण त्यांनी भाजपच्या पदाधिकार्‍यांना दिले. त्यामुळे मतभेद विसरून समन्वयाने काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला.