शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस-राकाँची कुरघोडीत ‘आघाडी’!

By admin | Updated: August 31, 2014 01:17 IST

आज कॉँग्रेसकडूनही उर्वरित जागांसाठी मुलाखती; मूर्तिजापूरचा समावेश.

अकोला : राष्ट्रवादी कॉँग्रेसने विधानसभेच्या २८८ जागांसाठी मुलाखती घेतल्याने आता कॉँग्रेसनेही स्वबळावर लढण्याच्या दिशेने तयारी सुरू केली आहे. यापूर्वी १७४ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या कॉँग्रेस पक्षश्रेष्ठींनी आता रविवारी उर्वरित ११४ जागांसाठी मुलाखतीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वाट्यावर असलेल्या मूर्तिजापूर मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामुळे जागा वाटपावरून कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकमेकांवर कुरघोडीत कशी ह्यआघाडीह्ण घेता येईल, यासाठीच प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या अकोला पूर्व, अकोला पश्‍चिम, आकोट, बाळापूर आणि मूर्तिजापूर या पाच मतदारसंघांसाठी कॉँग्रेसने इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. जिल्हा कॉँग्रेस कमिटीने पाचही मतदारसंघांसाठी एकूण ७२ अर्ज पाठविले. १७ ऑगस्ट रोजी अकोला पूर्व व पश्‍चिम, आकोट आणि बाळापूर या चार विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या सामूहिक मुलाखती कॉँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात घेण्यात आल्या. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या ताब्यात असलेल्या मूर्तिजापूर मतदारसंघासाठी मुलाखती घेण्यात आल्या नाहीत. राष्ट्रवादी कॉँग्रेसने सर्वच विधानसभा मतदारसंघातून इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. यामध्ये आकोट ७, बाळापूर ५, अकोला पूर्व ४, अकोला पश्‍चिम १७ व मूर्तिजापूर या मतदारसंघासाठी प्रत्येकी अर्ज केले होते. त्यानुसार गत आठवड्यात मुंबई येथे इच्छुकांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसने १४४ जागांची मागणी रेटून धरली. कॉँग्रेसने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे दबावतंत्राचा भाग म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसने सर्वच २८८ जागांसाठी मुलाखती घेतल्या. परिणामस्वरूप कॉँग्रेसनेही सर्वच जागांसाठी मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्‍चिम, बाळापूर आणि आकोट हे पाच मतदारसंघ कॉँग्रेसच्या तर मूर्तिजापूर मतदारसंघ राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वाट्यावर आहे. मात्र, आता कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये जागा वाटपाचा तिढा सुरूच असल्याने इच्छुक धास्तावलेले आहेत.