शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राकाँच्या पदाधिका-यांना फटकारले!

By admin | Updated: October 13, 2016 02:50 IST

संघटन बांधणीसाठी पदाधिका-यांची मरगळ दिसून आल्याने पक्षश्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली.

अकोला, दि. १२- आगामी महापालिकेच्या निवडणुक तोंडावर असताना पक्षनेत्यांमध्ये अजूनही मरगळ कायम असल्याची टीका करीत अकोल्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना पक्षश्रेष्ठींनी फटकारले आहे. सर्व नेते मंडळीसमोर झालेल्या या प्रकाराची चर्चा आता दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांंंमध्ये चांगलीच रंगू लागली आहे.काँग्रेसची अमरावतीला आणि राष्ट्रवादीची नागपुरात पक्षश्रेष्ठींनी बैठक घेतली. या दोन्ही बैठकीत अकोल्यातील स्थानिक पदाधिकार्‍यांच्या संघटन बांधणीवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. निवडणुका तोंडावर असतानादेखील पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांच्या बैठका आणि मोर्चे बांधण.ीला सुरुवात झालेली नाही ही बाब पक्षङ्म्रेष्ठींनी दोन्ही पक्षाच्या पदाधिकार्‍यांना लक्षात आणुन दिल्याची माहिती आहे. काँग्रेसचे अकोला जिल्हा पदाधिकारी या बैठकीला गेले होते. बैठकीत प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी नाराजी व्यक्त करीत तालुका बैठका वाढविण्याच्या सूचना पदाधिकारी यांना केल्यात.तसेच, जिल्ह्यातील मोर्चेबांधणीचा आढावाही घेतला. त्यामुळेच काँग्रेसने पक्षसंघटनेसाठी आता बैठका घेणे सुरू केले आहे.राष्ट्रवादीची बैठक गेल्याच आठवडयात नागपुरात पार पडली. या बैठकीत एका माजी आमदारांना आणि एका ज्येष्ठ नेत्यांला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बोलण्याची देखील संधी दिली नाही. कुणाला पक्ष बांधणीवरही एखादी शार्टफिल्म काढा, चित्रपट खूप झालेत. असे सुनावले तर कुणाचा बँकेच्या बाहेर निघा, पक्ष सांभाळा अशा शब्दात राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी समाचार घेतला. निवडणुका लागल्या, की उमेदवार आ.णि कार्यकर्ते उगवतात. मोर्चेबांधणीचे प्रयोगही तेव्हाच सुरू होतात. त्यामुळे यंदा तसे करू नका, आतापासूनच संघटन विणण्याचे कामास लागा, असे आवाहनही केले. अकोल्यातील राजकीय क्षेत्रात सध्या हीच चर्चा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे.