शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस, भाजप, राकॉँमध्ये घमासान

By admin | Updated: October 10, 2014 01:17 IST

भाजपमध्ये अंतर्गत राजकारण; स्टार प्रचारकांनी फिरवली पाठ

अकोला : जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघांच्या उमेदवारीचा मुद्दा भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठेचा केल्याने पक्षाच्या प्रादेशिक व राष्ट्रीय नेत्यांमध्ये जुंपली आहे. परिणामस्वरूप अकोला जिल्ह्यात भाजपच्या स्टार प्रचारकांसह इतर नेत्यांच्याही सभांचे आयोजन अद्यापपर्यंतही झालेले नाही. नेत्यांमधील या सुंदोपसुंदीने उमेदवारांमध्ये मात्र अस्वस्थता पसरली आहे. अकोला पश्‍चिम आणि बाळापूर या दोन मतदारसंघातील उमेदवारीवरूनही भाजपमध्ये प्रचंड रस्सीखेच झाली होती. अकोला पूर्व, बाळापूर आणि जिल्ह्यातील आणखी काही मतदारसंघांच्या उमेदवारीसाठी स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. बाळापूर मतदारसंघ महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसंग्राम संघटनेला सोडण्याचा निर्णय जवळपास झाला होता; मात्र ऐनवेळेवर या मतदारसंघातूनही भाजपच्या उमेदवाराला रिंगणात उतरविण्यात आले. परिणामस्वरूप भाजपचे प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवरील नेते नाराज झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची तीन दिवसांपूर्वी अकोल्यातील रद्द झालेली सभा याचाच परिपाक आहे. गडकरी यांनी बुधवारी आकोट येथील सभेला संबोधित केले; मात्र त्यांनी अकोला येथे सभा घेणे टाळले. त्यामुळे अकोल्यात स्टार प्रचारकांच्या सभा होण्यासाठी, आता भाजपच्या उमेदवारांनी थेट राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. एकूणच नेत्यांमधील चढाओढीच्या राजकारणामुळे उमेदवारांची धडधड वाढली आहे.