शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची भारिपला आघाडीची ‘ऑफर’!

By admin | Updated: October 25, 2016 02:55 IST

प्रकाश आंबेडकर यांच्याकडे भारिप-काँग्रेस आघाडीचा प्रस्ताव

खामगाव, दि. २४- खामगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्यावतीने माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी भारिपचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे भारिप-काँग्रेस आघाडीचा प्रस्ताव ठेवला आहे. खामगाव नगर परिषदेवर अनेक वर्षांपासून काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. त्याचप्रमाणे विधानसभा मतदार संघदेखील सतत १५ वर्षे काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जात होता; मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपने काँग्रेसच्या या गडाला खिंडार पाडली आहे. दरम्यान, नगर परिषदेमधील काँग्रेसची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आणि त्यांचे बंधू अशोकसिंह सानंदा यांनी शर्थीचे प्रयत्न चालविले आहेत. नगर परिषदेच्या सत्तेपासून भाजपला दूर ठेवण्यासाठी इतर कोणत्याही पक्षासोबत आघाडी करण्याचे संकेत माजी आमदार सानंदा यांनी यापूर्वीच दिले होते. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि भारिप-बहुजन महासंघाची आघाडी होणार असल्याची चर्चा शहरात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही काँग्रेसने इतर पक्षांसोबतच भारिपसोबत युती करुन स्पष्ट बहुमत मिळविले. हेच समीकरण नुकत्याच झालेल्या तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतही राबविण्यात येवून भाराकाँ व भारिप युतीने अनेक ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतली आहे. आता पुन्हा एकदा भारिप-काँग्रेसची आघाडी होण्याची शक्यता आहे. भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर रविवारी बुलडाणा जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. खामगाव येथे एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत माजी आमदार सानंदा यांनी भारिप-काँग्रेस आघाडीचा प्रस्ताव अँड.आंबेडकरांसमोर ठेवला आहे. भाजप-शिवसेना वगळता समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याबाबत आंबेडकरांनीसुद्धा भारिपच्या पदाधिकार्‍यांना हिरवी झेंडी दिली असल्याची माहिती आहे. खामगाव नगर परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून आघाडीचा प्रस्ताव आला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत याबाबत चर्चा सुध्दा झाली आहे. मंगळवारी याबाबत अँड.आंबेडकर यांच्यासोबत पुन्हा चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल.- अशोक सोनोनेजिल्हाध्यक्ष भारिप-बमसं