शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष निधीवरून कॉँग्रेसमध्ये नाराजी!

By admin | Updated: November 6, 2014 00:50 IST

अकोल्यातील स्थानिक काँग्रेस पदाधिका-यांचा दावा.

अकोला: कॉँग्रेसचे प्रचार प्रमुख नारायण राणे यांनी निवडणुकीत अनेक उमेदवारांना पैसे (पक्षनिधी) व अन्य रसद पोहोचली नसल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर आता निवडणुकीत जिल्ह्यातील कॉँग्रेस उमेदवारांना पक्षनिधी अल्प प्रमाणात मिळाल्याची बाब समोर आली आहे. पक्षनिधीवरून जिल्ह्यात नाराजी पसरली असून, अल्पनिधीचा परिणाम प्रचारावर झाला होता, असा दावाही आता पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांकडून होत आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्यासाठी कॉँग्रेसमध्ये प्रचंड रस्सीखेच झाली होती. सर्वात जास्त रस्सीखेच अकोला पश्‍चिम मतदारसंघात झाली होती. अकोला पश्‍चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी कॉँग्रेसमधील एका गटाने ह्यपॅनलह्ण तयार केले होते. या पॅनलमधील सदस्यांनी उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. मात्र पॅनलमधील सदस्याला उमेदवारी मिळाली नाही. दरम्यान, निवडणुकीत जागा वाटपावरून क ॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आघाडीत बिघाडी झाली. त्यामुळे जिल्ह्यातील विधानसभेच्या पाचही मतदारसंघातून उमेदवार उभे केले. अकोला पश्‍चिम मतदारसंघातून उषा विरक, मूर्तिजापूर मतदारसंघातून श्रावण इंगळे, आकोटमधून महेश गणगणे, बाळापूरमधून सैय्यद नातिकोउद्दिन खतीब आणि अकोला पूर्वमधून डॉ. सुभाष कोरपे यांनी निवडणूक लढविली. ऐन प्रचाराच्या काळात कॉँग्रेसमध्ये निलंबन आणि राजीमान्याचे नाट्य रंगले . १0 पेक्षा आजी-माजी पदाधिकार्‍यांवर प्रतिस्पर्धी उमेदवाराचा प्रचार करीत असल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे युवक कॉँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले होते. जिल्ह्यात कॉँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक आणि पृथ्वीराज चव्हाण वगळता राज्यातील अन्य नेत्यांच्या सभा झाल्या नाहीत. निवडणुकीत कॉँग्रेसच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता कॉँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्रच सुरू झाले. निवडणुकीत उमेदवारांना देण्यात येणार्‍या पक्षनिधीवरून आरोपास सुरुवात झाली आहे. उमेदवारांना अल्प निधी मिळाला होता. याबाबत अकोला पूर्वमधून निवडणूक लढविलेले डॉ. सुभाष कोरपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पक्षनिधीबाबत बोलण्यास नकार दिला.