शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

काँग्रेस आघाडीचे गु-हाळ सुरूच !

By admin | Updated: January 31, 2017 02:11 IST

आज काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक; अकोल्यातील काँग्रेसकार्यकर्त्यांना घोषणेची प्रतीक्षा.

अकोला, दि. ३0- महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादीने भाजप-शिवसेनेसोबत दोन हात करण्याची तयारी चालवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सन्मानजनक आघाडीचे संकेत दिल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये आघाडीच्या हालचालींनी वेग घेतला. सोमवारी मुंबईत आघाडीच्या मुद्यावर दोन्ही पक्षांत चर्चेच्या फैरी झडल्या; मात्र ठोस निर्णय होऊ शकला नाही. महापालिकेत साडेसात वर्षे सत्तापदाची धुरा सांभाळल्यानंतर अकोलेकरांनी मागील अडीच वर्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी बाकांवर बसवले. मनपासह केंद्र व राज्यात सत्तास्थानी असलेल्या भाजप-शिवसेना युतीच्या कालावधीत शहरातील विकास कामे ठप्प पडल्याचा विरोधकांचा आरोप आहे. निवडणुकीच्या कालावधीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार असल्या तरी सत्ताधार्‍यांची बाजू लक्षात घेता काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात दोन्ही पक्षांतील नेते, वरिष्ठ पदाधिकार्‍यांमध्ये मुंबईत २७ जानेवारी रोजी पहिली बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीने ४८ जागांचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांकडून प्राप्त प्रस्तावांवर संबंधित नेत्यांच्या उपस्थितीत चर्चा सुरू असून जागा वाटप कळीचा मुद्दा ठरत आहे. त्यामुळे सलग चौथ्या दिवशीदेखील आघाडीचा तिढा सुटू शकला नाही. आघाडीच्या संदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. उद्या मंगळवारी मुंबईत काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये माणिकराव ठाकरे उपस्थित राहतील. सन्मानजनक आघाडी व्हावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. मुस्लीमबहुल प्रभागात मैत्रीपूर्ण लढतीसाठी आम्ही आग्रही आहोत. - बबनराव चौधरी, शहर अध्यक्ष, काँग्रेसजागा वाटपाच्या संदर्भात आम्ही काँग्रेसकडे प्रस्ताव दिला असून आघाडी करण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. काँग्रेसच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. -विजय देशमुख, जिल्हाध्यक्ष राकाँ.