शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सभापती पदांसाठी सदस्यांची मनधरणी!

By admin | Updated: July 7, 2016 02:18 IST

अकोला जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक १३ जुलै रोजी.

अकोला: जिल्हा परिषदेच्या चार सभापती पदांसाठी १३ जुलै रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. या पृष्ठभूमीवर महाआघाडी आणि सत्ताधारी भारिप-बहुजन महासंघाच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. त्यामध्ये सदस्यांच्या बैठका घेऊन, आवश्यक असलेले संख्याबळ जुळविण्यासाठी सदस्यांची मनधरणी केली जात आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी गत आठवड्यात निवडणूक घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, महिला व बालकल्याण, कृषी व पशुसंवर्धन आणि आरोग्य व अर्थ इत्यादी चारही विद्यमान सभापतींचा अडीच वर्षांचा कालावधी १२ जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी जिल्हा परिषदेच्या चार नवीन सभापतींची निवड १३ जुलै रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलविण्यात आली आहे. सभापती पदांची निवडणूक सात दिवसांवर येऊन ठेपल्याने, जिल्हा परिषदेतील राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. त्यामध्ये सत्ताधारी भारिप-बमसं आणि शिवसेना-भाजप, काँग्रेस मिळून तयार झालेल्या महाआघाडीच्या नेत्यांकडून सदस्यांच्या बैठका घेऊन चर्चा केली जात आहे. त्यामध्ये सभापती पदांच्या निवडणुकीत आवश्यक असलेल्या संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासाठी सदस्यांची मनधरणी केली जात आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सभापती पदांच्या निवडणुकीत महाआघाडीची मोट बांधण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये महाआघाडीत सहभागी पक्षांच्या जिल्हा परिषद सदस्यांची बैठक गत सोमवारी घेण्यात आली असून, सभापती पदांच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. तर भारिप-बमसं स्थानिक नेत्यांसह जिल्हा परिषद सदस्यांची बैठकदेखील मंगळवारी पार पडली. त्यामध्ये सभापती पदांच्या निवडणुकीत आवश्यक असलेल्या सदस्यांच्या संख्याबळाच्या मुद्दय़ावर चर्चा करण्यात आली. एक अपक्ष सदस्यासह अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सहकार्य केलेल्या सदस्यांसोबतही भारिप-बमसंकडून चर्चा केली जात आहे.