शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण केंद्रांमध्ये गोंधळ; मनपा आयुक्तांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST

अकोला : ज्येष्ठ नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या लसीचा मागील तीन दिवसांपासून तुटवडा निर्माण झाला होता. गुरुवारी महापालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये लस ...

अकोला : ज्येष्ठ नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या लसीचा मागील तीन दिवसांपासून तुटवडा निर्माण झाला होता. गुरुवारी महापालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये लस उपलब्ध होताच ती घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाचे नियोजन कोलमडल्याने लसीकरण केंद्रांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. या प्रकाराची माहिती मिळताच मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी तातडीने लसीकरण केंद्रांची पाहणी केली.

जीवघेण्या कोरोना विषाणूची लागण होऊन बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय असो वा शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता निर्माण झाली आहे. एकूणच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता अकोलेकरांनी आता लस घेण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. यादरम्यान मध्यंतरी ज्येष्ठ नागरिकांसाठी लस उपलब्ध नसल्यामुळे महापालिकेची चार लसीकरण केंद्रे बंद झाली होती. गुरुवारी ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध होताच महापालिकेच्या लसीकरण केंद्रांमध्ये नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. या वेळी लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना रांगेमध्ये ताटकळत उभे राहावे लागल्यामुळे लसीकरण केंद्रांमध्ये काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. नागरिकांनी महापालिकेच्या नियोजनशून्य कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकाराची माहिती मिळताच मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी मनपाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व लसीकरण केंद्रांची तातडीने पाहणी केली.

उन्हामुळे ज्येष्ठ नागरिकांची दमछाक

महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या लसीकरण केंद्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना पिण्यासाठी पाणी व बसण्यासाठी व्यवस्था उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून येते. यामध्ये भरतिया रुग्णालयाचा अपवाद वगळल्यास इतर ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था नसून भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे ज्येष्ठ नागरिकांची दमछाक होत असून या प्रकाराची मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी तातडीने दखल घेणे गरजेचे झाले आहे.

निमा अरोरा पोहोचल्या थेट शवविच्छेदन कक्षात!

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात मनपाच्या वतीने लसीकरण केंद्र उघडण्यात आले आहे. या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेलेल्या आयुक्त निमा अरोरा यांनी अचानक शवविच्छेदन कक्षात धाव घेतली. या वेळी कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी सोपविलेले मनपाचे स्वच्छता व आरोग्य विभागप्रमुख प्रशांत राजूरकर तसेच मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे कच्ची मेमन जमातीचे पदाधिकारी जावेद जकेरीया यांच्याकडून कामकाजाची माहिती घेतली.