शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या मुहूर्तावरून संभ्रम

By admin | Updated: January 15, 2015 01:27 IST

कारवाईसाठी अकोला महापालिकेची तयारी; पोलीस प्रशासन म्हणते आधी अभ्यास करू, मगच निर्णय.

अकोला: शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची संयुक्त मोहीम राबविण्याची घोषणा करणार्‍या महापालिका आणि पोलीस प्रशासनामध्ये कारवाईचा ह्यमुहूर्तह्ण शोधण्यावरून संभ्रम दिसून येत आहे. एकीकडे महापालिका प्रशासन गुरुवारपासूनच धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई करण्यासाठी सज्ज असल्याचे म्हणत असले, तरी पोलीस प्रशासन मात्र या कारवाईबाबत सावध भूमिका घेत आहे. यावरून मनपा आणि पोलिसांमध्ये कारवाईबाबत मतभिन्नता दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार शहरातील २00९ नंतर अतिक्रमण केलेल्या धार्मिक स्थळांवर महापालिका जेसीबी चालविणार असल्याचे मंगळवारी मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर व साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने नोटीसेस बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. झोनल अधिकार्‍यांना अनधिकृत धार्मिक स्थळांची माहिती घेऊन नोटीस देण्याचे आदेश उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी दिलेत.*नोटीस मंदिरांवर चिकटवणारशहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे व्यवस्थापन कुणाकडे आहे, याबाबतची माहिती असण्याची शक्यता नसल्याने नोटीस कुणाला बजाविणार, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यावर उपाय म्हणून मनपा प्रशासनाने धार्मिक स्थळाचे व्यवस्थापन बघणारे कुणी नसेल तर थेट मंदिरावर नोटीस चिकटवून त्याचे छायाचित्र काढण्याचे आदेश उपायुक्तांनी दिले आहे. *नोटीसचे उत्तर न दिल्यास थेट कारवाईकारवाई करण्यापूर्वी महापालिकेच्यावतीने धार्मिक स्थळ, धार्मिक संस्थांना नोटीस बजाविणार आहे. धार्मिक संस्था, ट्रस्ट, संचालकांनी नोटीसचे उत्तर दिले नाही किंवा धार्मिक स्थळांसंबंधीची कागदपत्रे सादर केली नाही, तर या धार्मिक स्थळांवर थेट कारवाई करण्यात येईल. वेळेवर कोणतीही बाजू ऐकून घेतली जाणार नसल्याचेही मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर व साहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्पष्ट केले. *३00 अनधिकृत धार्मिक स्थळे?सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी महापालिका व पोलीस प्रशासनाने शहरातील धार्मिक स्थळांचे सर्व्हेक्षण सुरू केले आहे. शहरात सुमारे ३00 अनधिकृत धार्मिक स्थळं असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुरुवारी यादी तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मनपा उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी बुधवारी बिट निरीक्षक यांची एक बैठक घेऊन त्यांच्या परिसरात असलेल्या धार्मिक स्थळांची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. *या मार्गावर होणार आधी कारवाईमहापालिका प्रशासनातर्फे अनधिकृत धार्मिक स्थळ काढण्याची कारवाई प्रथम रेल्वे स्थानक चौक ते अशोक वाटिका मार्गावर केली जाईल. त्यानंतर खुले नाट्यगृह ते रेल्वे मालधक्यापर्यंतच्या मार्गावर कारवाई केली जाणार असल्याचे उपायुक्त चिंचोलीकर यांनी सांगितले.