शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

मनपाचा गोंधळ; हद्दवाढीतील कंत्राटदारांना २० टक्के भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 15:14 IST

अहवाल सादर केल्यानंतरच देयक अदा करण्याच्या मुद्यावर तातडीने तोडगा न काढता जाणीवपूर्वक कंत्राटदारांना वेठीस धरण्यात आले

अकोला: मनपातील बांधकाम विभागाच्या जबाबदारीचा सतत ‘गजर’ करणाºया एका प्रभारी वरिष्ठ अधिकाºयाच्या आडमुठेपणामुळे हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामांची गती मंदावल्याचे समोर आले आहे. विकास कामांचे लेखापरीक्षण करणाºया अमरावती येथील त्रयस्थ यंत्रणेने अहवाल सादर केल्यानंतरच देयक अदा करण्याच्या मुद्यावर तातडीने तोडगा न काढता जाणीवपूर्वक कंत्राटदारांना वेठीस धरण्यात आले. विधानसभा निवडणुकीनंतर सदर प्रकरण अंगावर शेकण्याच्या धास्तीमुळे प्रशासनाने घाईघाईत कंत्राटदारांच्या देयकातून दहा टक्के सुरक्षा रक्कम आणि दहा टक्के लेखापरीक्षण अहवालासाठी असे एकूण २० टक्के रक्कम वगळता उर्वरित रक्कम अदा करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.राजकीय सोयीसाठी महापालिकेला हाताशी धरत शहरालगतच्या १३ प्रमुख ग्रामपंचायतींसह २४ गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश करण्यात आला. सप्टेंबर २०१६ मध्ये मनपा क्षेत्राची हद्दवाढ करण्यात आल्यानंतर २०१८ मध्ये हद्दवाढ परिसरातील विकास कामांसाठी महापालिकेला शासनाकडून ९७ कोटी ३० लक्ष रुपये प्राप्त झाले. सद्यस्थितीत पहिल्या टप्प्यात ५५ कोटी ४८ लक्ष रुपये किमतीची कामे सुरू आहेत. मागील सहा महिन्यांच्या कालावधीत संबंधित कंत्राटदारांनी ४५९ प्रस्तावित कामांपैकी सुमारे ४२ रस्त्यांची कामे निकाली काढली. उर्वरित नाल्या, पथदिवे, जलवाहिनीची कामे अर्धवट स्थितीत आहेत. यादरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार मनपाने विकास कामांच्या दर्जाची त्रयस्थ यंत्रणेकडून तांत्रिक लेखापरीक्षण करण्यासाठी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची नियुक्ती केली. सदर यंत्रणेकडून रस्त्यांच्या गुणवत्ता तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच देयक अदा केले जाईल, अशी आडमुठेपणाची भूमिका बांधकाम विभागातील प्रभारी वरिष्ठ अधिकाºयाने घेतली. यामुळे कंत्राटदारांच्या कोट्यवधींच्या देयकांना चाप लागला. देयक प्राप्त होत नसेल तर पुढील कामे कशी करायची, असा कंत्राटदारांचा रास्त सवाल होता. त्यावर बांधकाम विभागातील संबंधित अधिकाºयांनी तातडीने तोडगा काढणे अपेक्षित होते. तसे न झाल्यामुळे कंत्राटदारांनी विकास कामांसाठी हात आखडता घेतल्यामुळे विकास कामांची गती मंदावल्याची माहिती आहे.अन् कंत्राटदारांच्या तोंडचे पाणी पळाले!बांधकाम विभागाचे कामकाज पाहणाºया ‘त्या’अधिकाºयाने तपासणी अहवालानंतरच देयकांच्या फाइलला मंजुरी देण्याची हेकेखोर भूमिका घेतल्याने आयुक्त संजय कापडणीस, उपायुक्त विजयकुमार म्हसाळ तसेच मुख्य लेखाधिकारी मनजित गोरेगावकर यांची कोंडी झाली. त्यामुळे घाईघाईत त्रयस्थ यंत्रणांसोबत चर्चा करून कंत्राटदारांच्या देयकातून २० टक्के रक्कम कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे कंत्राटदारांच्या तोंडचे पाणी पळाल्याची चर्चा आहे.

प्रशासनाला अडचणीत आणण्याचा प्रयत्नविकास कामांची तपासणी करणाऱ्या त्रयस्थ यंत्रणेच्या अहवालाचा दाखला देत जाणीवपूर्वक कंत्राटदारांच्या थकीत देयकांवर निर्णय घेण्यात आला नाही. बांधकाम विभागाच्या जबाबदारीचा भार असह्य झाल्याची सतत कुणकुण करणाºया एका अधिकाºयाकडून शासनाच्या अधिकाऱ्यांनाअडचणीत आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला