शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पोळा साजरा करण्यासंदर्भात संभ्रम!

By admin | Updated: August 31, 2016 02:56 IST

पोळा सण बुधवारी करावा की गुरुवारी, हा संभ्रम कायम.

अकोला, दि. ३0: भारतीय संस्कृतीमध्ये पोळा उत्सवाला मोठे महत्त्व आहे. शेतकर्‍यांचा हा सण. आपल्यासाठी वर्षभर शेतात घाम गाळणार्‍या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण. पोळा हा श्रावणातील पिठोरी अमावस्येला येतो; परंतु नागरिकांमध्ये पोळा सण साजरा करण्यासंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. काही कॅलेंडरमध्ये पोळा ३१ ऑगस्टला तर काही कॅलेंडरमध्ये १ सप्टेंबरला दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे कोणता पोळा साजरा करावा, याविषयी नागरिकांसह शेतकर्‍यांच्या मनात संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. कौटुंबिक पूजाविधी करणारे पुरोहित, भटजी यांच्याकडून कोणत्या दिवशी पोळा साजरा करावा, याविषयी अनेक जण माहिती घेत आहेत. महाराष्ट्रामध्ये पोळा सणाला अनंत काळापासून महत्त्व आहे. शेतकर्‍यांसोबत शेतात राबणार्‍या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. या दिवशी लाडक्या बैलांचे खांदे हळद, तुपाने चोळून, त्यांचा शृंगार केला जातो. ठोंबर्‍यासह पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जातो. असा हा पोळा यावर्षी प्रथमच दोन वेगवेगळय़ा तारखांना दाखविल्या गेल्यामुळे नागरिक व शेतकर्‍यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पोळा कोणत्या दिवशी साजरा करावा, याविषयी चर्चा सुरू झाली आहे. खरा पोळा कोणता, असा प्रश्न आपल्या भटजी, पुरोहिताकडे विचारल्या जात आहे. दरवर्षी पोळा पिठोरी अमावस्येला येतो. यावर्षी दर्श पिठोरी अमावस्या ही ३१ ऑगस्ट रोजी आली आहे; परंतु काही कॅलेंडरमध्ये पोळा १ सप्टेंबर रोजी दर्शविण्यात आला असल्याने नागरिक व ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचा गोंधळ उडालेला आहे. ग्रामीण भागात कोणत्या तारखेला पोळा साजरा करावा, याविषयी गावातील वयोवृद्ध व जाणत्या व्यक्तीला विचारणा होऊ लागली आहे; परंतु पोळय़ांच्या तारखांबाबत पंचांगाचे अभ्यासक, भटजी, पुरोहितांमध्ये मतभिन्नता असल्याचे दिसून येते. कोणी म्हणते, ३१ तारखेला पोळा साजरा करावा तर कोणी म्हणते १ सप्टेंबर रोजी करावा. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखीच संभ्रम निर्माण झाला आहे. तारखांबाबतचा घोळ पहिल्यांदाचविविध कॅलेंडरमध्ये पोळा ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी दाखविण्यात आल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. पोळय़ाच्या दोन तारखांचा घोळ पहिल्यांदाच झाल्यामुळे नागरिक पोळय़ाची कोणती तारीख खरी आहे, कोणत्या तारखेला पोळा साजरा करावा, याबाबत विचारात पडले आहेत.पोळा गुरुवारीच साजरा करण्याचे आवाहनअकोला शहरात पोळा गुरुवारीच साजरा करण्याचा निर्णय मंगळवारी पोळा उत्सव समिती व पोळ्यात मान असलेल्या जुन्या-जाणत्या बैलजोडी मालकांनी घेतला आहे. पोळा ३१ ऑगस्टला की १ सप्टेंबरला, यावर नागरिकांमध्ये व ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे. हा संभ्रम दूर करण्याकरिता मंगळवारी दुपारी पोळा चौक येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत पंचांगानुसार पोळा १ सप्टेंबरलाच साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामस्थांनादेखील १ सप्टेंबरलाच पोळा साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीला मानाच्या बैलजोडीचे मालक दशरथ वानखडे, नामदेव वानखडे, पोळा उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल मालगे, दिलीप भगत, रामेश्‍वर वानखडे आदींसह बैलजोडी मालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.