शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

संगणकीय सात-बाराचे तीनतेरा

By admin | Updated: June 28, 2014 22:40 IST

सात-बारा उतारे संगणकावर उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात तलाठी कार्यालयात या योजनेचे तीन-तेरा वाजले आहेत.

बुलडाणा : राज्याच्या महसूल विभागात सध्या ई-गव्हर्नन्सचा बोलबाला आहे. अचुकता, तत्परता साधत कामात गतिमानता आणण्यासाठी शेतकर्‍यांसाठी उपयुक्त सात-बारा उतारे संगणकावर उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अंमबजावणीबाबत जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने तलाठी कार्यालयात या योजनेचे तीन-तेरा वाजले आहेत. संगणकावरील छपाईचे सात-बारा उतारे देण्याचे तहसीलदारांचे एक वषार्पुवीच सर्व तलाठय़ांना आदेश दिले. मात्र अनेक तालुक्यातील विविध भागात आजही हस्तलिखीतातील सात-बारे दिले जातात. कामात गतिमानता नसल्याने शेतकर्‍यांना तासंतास तलाठी कार्यालयात ताटकळत बसावे लागते. एका तलाठय़ांकडे अनेक गावांची सूत्रे असल्याने उतारे मिळविण्यासाठी कार्यालयात शेतकर्‍यांनाची गर्दी वाढत आहे. शासन आपल्या दारी असा नारा प्रशासन देत असला तरी शेतकर्‍यांची गैरसोय कमी होताना दिसत नाही. सध्या पेरणीचे दिवस सुरू झाले आहेत. बँकांमध्ये कर्ज प्रकरणे करण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड सुरु आहे. मात्र कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी शेतकर्‍यांना तलाठय़ाच्या दारी हेलपाटे मारावे लागतात. तलाठी मुख्यालयी रहात नसल्याचा फटका शेतकर्‍यांना बसतो. तहसील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य जनतेचा खोळंबा होत आहे.