शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तडजोडीचा धनादेश अनादर आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 14:06 IST

अकोला : धनादेश अनादर प्रकरणात न्यायालयासमोर रक्कम देण्याची तडतोड झाल्यानंतर तडजोडीतील रक्कम अदा करण्यासाठी दिलेला धनादेश पुन्हा अनादरित झाल्यामुळे तसेच न्यायालयाचे समन्स न स्वीकारणाºया एका आरोपीस सिटी कोतवाली पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. प्रथमश्रेणी न्यायालयाने गिरीश मंत्री नामक या आरोपीस १६ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.गोपाल अग्रवाल, अंशुल लोहिया व ...

अकोला : धनादेश अनादर प्रकरणात न्यायालयासमोर रक्कम देण्याची तडतोड झाल्यानंतर तडजोडीतील रक्कम अदा करण्यासाठी दिलेला धनादेश पुन्हा अनादरित झाल्यामुळे तसेच न्यायालयाचे समन्स न स्वीकारणाºया एका आरोपीस सिटी कोतवाली पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. प्रथमश्रेणी न्यायालयाने गिरीश मंत्री नामक या आरोपीस १६ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.गोपाल अग्रवाल, अंशुल लोहिया व रमेशचंद्र लोहिया या तीनही व्यापाºयांनी गिरीश मोतीलाल मंत्री याला प्रत्येकी ७५ हजार रुपयांची रक्कम कामकाजासाठी दिली होती. ही रक्कम परत करण्यासाठी गिरीश मंत्री याने तीनही व्यापाºयांना धनादेश दिला होता. या तीनही व्यापाºयांनी रक्कम परत मिळविण्यासाठी सदर धनादेश बँकेत वटविण्यासाठी दिला असता तो अनादरित झाला. त्यामुळे या तीनही व्यापाºयांनी गिरीश मंत्री याच्याविरुद्ध कलम १३८ नुसार न्यायालयात दावा दाखल केला. सदर धनादेश अनादरचे प्रकरण सुरू असतानाच आरोपी व तक्रारकर्ते यांच्यात न्यायालयासमोर तडजोड झाली. तीनही व्यापाºयांची व्याजासह रक्कम ८ लाख २५ हजार रुपये देण्याचे आरोपी गिरीश मंत्री याने न्यायालयासमोर मान्य करीत तसा धनादेश दिला. सदरचा धनादेश या तीन व्यापाºयांनी बँकेत वटविण्यासाठी दिला असता हा तडजोडीचा धनादेशही अनादरित झाला. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेऊन गिरीश मंत्री याच्यावर कारवाईची मागणी केली. प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी ए. बी. रेलकर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली असता आरोपी हजर झाला नाही.त्यामुळे न्यायालयाने समन्स बजावले; मात्र ते गिरीश मंत्री याने स्वीकारलेच नाही. हा खटाटोप सुरू असतानाच न्यायालयाने गिरीश मंत्री याच्याविरुद्ध गैरजमानती वॉरंट काढला. त्यामुळे सिटी कोतवाली पोलिसांनी मंत्री याला मंगळवारी अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर गिरीश मंत्री याचा जामीन अर्ज फेटाळत त्याला १६ आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. याप्रकरणी फिर्यादी व्यापाºयांच्यावतीने अ‍ॅड. मनोज अग्रवाल यांनी कामकाज पाहिले.