शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यात सातव्या वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:20 IST

अकोला : संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे महापालिकेच्या शाळा पुन्हा एकदा बंद करण्याची वेळ प्रशासनावर ओढवली आहे. अशा बिकट ...

अकोला : संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे महापालिकेच्या शाळा पुन्हा एकदा बंद करण्याची वेळ प्रशासनावर ओढवली आहे. अशा बिकट स्थितीमध्ये मोबाईलद्वारे ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. यामध्ये अवघ्या सहा महिन्यात इयत्ता सातव्या वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या हारीस खान फिरोज खान या विद्यार्थ्याचे थेट पंतप्रधान व मुख्यमंत्री कार्यालयाकडून कौतुक करण्यात आले आहे.

महापालिकेच्या ३३ शाळांमध्ये शहरातील सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांमध्ये अनेक गुणी व हुशार विद्यार्थी आहेत. आज रोजी त्यांना ऑनलाईन प्रणालीव्‍दारे शिक्षणाचे धड़े दिले जात आहेत. महानगरपालिकेच्‍या मनपा उर्दु शाळा क्र. ९मध्‍ये इयत्‍ता सातवीत शिकणाऱ्या हारीस खान फिरोज खान याने त्‍याचे वडील व खासगी शिकवणी संचालक फिरोज यांच्‍या मार्गदर्शनात सातव्‍या वर्गाचे संपूर्ण शिक्षण ६ महिन्‍यात पूर्ण केले. याबद्दलची पोस्‍ट सोशल मीडियावर व्‍हायरल झाल्‍याने प्रधानमंत्री कार्यालयातून

हारीस खान फिरोज खान या चिमुकल्या विद्यार्थ्याला

शिक्षणाच्‍या चर्चेसाठी आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच राज्‍याचे मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांच्‍याकडूनही शुभेच्‍छा संदेश प्राप्त झाला आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधींनी केले कौतुक

मनपाच्या उर्दू शाळेत इयत्ता सातव्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने कोरोनाच्या कालावधीत अवघ्या सहा महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण केल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच भाजपचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा तसेच स्थायी समिती सभापती संजय बडोणे यांनी पुष्‍पगुच्‍छ देऊन हारीस खान फिरोज खान या विद्यार्थ्‍याचे कौतुक केले.