शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचे पंचनामे तीन दिवसांत पूर्ण करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 02:03 IST

अकोला : तूर खरेदीसाठी जिल्हय़ात शेतकर्‍यांकडील तूर खरेदीचे पंचनामे तलाठी व कृषी सहायकांनी तीन दिवसांत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात जिल्हय़ातील मंडळ कृषी अधिकारी आणि महसूल मंडळ अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड उपस्थित होते. 

ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांचे निर्देश मंडळ अधिकार्‍यांची घेतली बैठकपंचनाम्याचे होणार परीक्षण!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तूर खरेदीसाठी जिल्हय़ात शेतकर्‍यांकडील तूर खरेदीचे पंचनामे तलाठी व कृषी सहायकांनी तीन दिवसांत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी दिले.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनाच्या सभागृहात जिल्हय़ातील मंडळ कृषी अधिकारी आणि महसूल मंडळ अधिकार्‍यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड उपस्थित होते. शासनाच्या अधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’द्वारे हमीदराने तूर खरेदी गत १0 जूनपासून बंद करण्यात आली. त्यानंतर खरेदी केंद्रांवर गत ३१ मेपर्यंंत टोकन देण्यात आलेल्या शेतकर्‍यांची तूर बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी करण्याचा निर्णय गत २१ जुलै रोजी शासनामार्फत घेण्यात आला. शासन निर्णयानुसार, ३१ ऑगस्टपर्यंंत तूर खरेदी पूर्ण करावयाची आहे. त्यानुसार टोकन देण्यात आलेल्या जिल्हय़ातील १४ हजार ५२४ शेतकर्‍यांची ३ लाख ५२ हजार क्विंटल तूर खरेदीची प्रक्रिया २६ जुलैपासून जिल्हय़ातील अकोला, अकोट, तेल्हारा, बाश्रीटाकळी व मूर्तिजापूर या पाचही खरेदी केंद्रांवर सुरू करण्यात आली आहे. टोकन देण्यात आलेल्या जिल्हय़ातील शेतकर्‍यांची तूर खरेदीची प्रक्रिया ३१ ऑगस्टपर्यंंत पूर्ण करण्यासाठी शेतकर्‍यांच्या घरोघरी जाऊन तलाठी व कृषी सहायकांनी तुरीचे पंचनामे करण्याचे काम तीन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी या बैठकीत दिले. या बैठकीला जिल्हय़ातील मंडळ कृषी अधिकारी आणि महसूल मंडळ अधिकारी उपस्थित होते.

सात-बारा ‘अपडेट’ करा! जिल्हय़ातील शेतकर्‍यांना १५ ऑगस्टपासून डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन सात-बारा वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी संगणकीकृत सात-बारातील त्रुटी दुरुस्त सात-बारा तातडीने ‘अपडेट’ करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी या बैठकीत दिले.

पंचनाम्याचे होणार परीक्षण!तूर खरेदीसाठी करण्यात आलेल्या पंचनाम्याचे परीक्षण नायब तहसीलदारांकडून करण्यात येणार आहे, तसेच जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून ट्रेडर्सची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे तुरीचे पंचनामे काटेकोरपणे करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या आहेत.