शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची कामे एका महिन्यात पूर्ण करा ! -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 11:40 IST

लागणाऱ्या सुविधा लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

अकोला : कोविड विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.यासाठी जिल्ह्यात असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ची कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित यंत्रणेला दिले.आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या कोविड-19 च्या संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते .यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ मीनाक्षी गजभिये, डॉ कुसुमाकर घोरपडे ,जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे ,डॉ सिरसाम, डॉ रमेश पवार ,सीपीडब्ल्यूडी चे कार्यकारी अभियंता बी .सुनील कुमार, संजय शेवाळे यांची  प्रमुख उपस्थिती होती.सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कामे त्वरित पूर्ण करावीत  यावर नियंत्रण अधिकारी म्हणून वैद्यकीय महाविद्यालया च्या अधिष्ठाता डॉ.गजभिये व उप अधिष्ठाता डॉ. घोरपडे हे काम पाहतील. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ला लागणारे यंत्रसामुग्री तसेच राहिलेले इतर कामे व कोविड हेल्थ सेंटर  म्हणून कामात येण्यासाठी लागणाऱ्या सुविधा लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.आयुर्वेदिक महाविद्यालय व अनुसंधान केंद्रामध्ये कोविड हेल्थ केअर युनिट सुरू करण्याबाबत प्राथमिक तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आयुर्वेदिक महाविद्यालयाची पाहणी केली. आयुर्वेदिक महाविद्यालयात पन्नास खाटांचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर येत्या दोन दिवसात सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.कोवीड रुग्णांची संख्या दिवसंदिवस वाढत चालली आहे यासाठी खाटांचे व्यवस्थापन करणे गरजेचे असून त्याचे नियोजन यावेळी करण्यात आले.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या