शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याचे काम पूर्ण करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:06 IST

कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांकडून ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे. कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याचे काम येत्या १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे जिल्हाधिकार्‍यांना दिला.

ठळक मुद्दे‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकार्‍यांना आदेश‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याचे काम येत्या १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांकडून ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे. कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्याचे काम येत्या १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे जिल्हाधिकार्‍यांना दिला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जिल्हाधिकार्‍यांची ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’ घेतली. त्यामध्ये कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसह इतर विषयांची जिल्हानिहाय माहिती संबंधित जिल्हाधिकार्‍यांकडून मुख्यमंत्र्यांनी घेतली. राज्य शासनामार्फत  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार शेतकर्‍यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीत राज्यात थकबाकीदार शेतकर्‍यांकडून ऑनलाइन भरून घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंंत आहे. त्यानुषंगाने कर्जमाफीसाठी पात्र थकबाकीदार शेतकर्‍यांकडून ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्याचे काम १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश अकोला जिल्हय़ासह राज्यातील सर्वच जिल्हाधिकार्‍यांना मुख्यमंत्र्यांनी दिले. कर्जमाफी योजनेच्या अकोला जिल्हय़ातील अंमलबजावणीची माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. कर्जमाफीसाठी पात्र ठरणारे जिल्हय़ातील शेतकरी व त्यापैकी २३ ऑगस्टपर्यंंत कर्जमाफीचे शेतकर्‍यांकडून ऑनलाइन भरून घेण्यात आलेल्या अर्जांंची माहितीही जिल्हाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’मध्ये दिली. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, महानगरपालिका आयुक्त अजय लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्यासह कृषी, जिल्हा उपनिबंधक व इतर संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सुटीच्या तीन दिवसातही भरले जाणार कर्जमाफीचे अर्ज!मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार, थकबाकीदार शेतकर्‍यांकडून कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे काम १५ सप्टेंबरपर्यंंत पूर्ण करण्यासाठी २५, २६ व २७ ऑगस्ट या सुटीच्या तीन दिवसातही जिल्हय़ातील सेतू केंद्रांवर कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले.

पिके, जलसाठय़ाचा घेतला आढावा!कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसह जिल्हय़ात आतापर्यंंत झालेला पाऊस, खरीप पिकांची परिस्थिती, धरणांमधील उपलब्ध जलसाठय़ाचा आढावादेखील मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडून घेतला.