शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

अकोल्यात आता दर रविवारी संपूर्ण तर दरराेज रात्री संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 20:43 IST

LockDown in Akola अकाेला शहरात संपूर्ण लॉकडाऊन पाळण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी केली. 

अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी आता पुढील आदेश येईपर्यंत दर रविवारी संपुर्ण संचारबंदी तसेच दररोज रात्रीची संचारबंदी, वाहनांतून प्रवास करतांना वाहनातील प्रवाशी संख्येवर मर्यादा, गर्दीच्या ठिकाणी कोरोणा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन या व अन्य बाबींवर जोर देण्यात आला आहे. यासंदर्भातील आदेश आज सायंकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.

या आदेशात म्हटल्यानुसार,

 

१) पुढील येणाऱ्या प्रत्‍येक रविवारी म्हणजेच शनिवारचे रात्री ०८.०० ते सोमवारचे सकाळी ०६.०० वाजेपर्यंत संपूर्ण अकोला जिल्ह्यात पुढील आदेशापर्यंत संपूर्णतः संचारबंदी लागू करण्‍यात आले आहे. या कालावधीत कोणत्‍याही व्‍यक्‍तीस मुक्‍त संचार करता येणार नाही.तसेच दरराेज रात्रीची संचारबंदी लागु केली आहे

 

यांना सवलत

अ) रूग्वाहिका

आ) रात्रीच्‍या वेळेस सुरु राहणारी औषधांची दुकाने.

 

इ) ठोक भाजीपाला विक्री, दुध व दुग्‍धजन्‍य पदार्थ विक्री करणाऱ्या डेअरी.

 

ई) रेल्‍वेने तसेच एस.टी. बस व प्रायव्‍हेट लक्‍झरीने उतरणाऱ्या प्रवाश्यांकरिता ऑटोरिक्‍शा.

उ) हायवेवरील पेट्रोल पंप व ढाबे.

ऊ) एम.आय.डी.सी. क्षेत्रातील उद्योगात जाण्यासाठी कर्मचारी कामगार यांना संचाबंदीच्‍या कालावधीत त्‍यांच्‍या कार्यालयातील ओळखपत्राचे आधारे जाण्‍या-येण्‍याकरिता परवानगी राहील

 

सक्तीचे नियम

जिल्‍हयातील महानगरपालिका सर्व नगर परिषद व नगर पंचायती क्षेत्रातील या आठवड्यात भरविण्‍यात येणारे आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद करण्‍यात येत आहेत.

लग्‍नसंमारंभाकरिता केवळ ५० व्‍यक्‍तींनाच उपस्थित राहता येईल. तसेच लग्‍नसमारंभाकरिता रात्री ८.०० वाजेपर्यंतच खालील नमूद केल्‍याप्रमाणे परवानगी आयोजकाने लग्‍नाचे स्‍थळ तसेच किती लोक उपस्थित राहणार आहेत याची माहिती संबंधीत पोलीस स्‍टेशन यांना कळविणे बंधनकारक राहील.

चारचाकी वाहनामध्‍ये १ ड्रायव्‍हर व ३ व्‍यक्‍ती व ऑटोरिक्‍शा वाहनामध्‍ये १ ड्रायव्‍हर व २ सवारी यांनाच परवानगी राहील.

सर्व प्रकारची दूकाने सकाळी ६ ते रात्री ८ या कालावधीत सुरु राहतील.

जिल्ह्यामधील सर्व शाळा व महाविद्यालये , सर्व प्रकारची खाजगी शैक्षणीक प्रशिक्षण केन्‍द्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्‍लासेस दि.२८ फेब्रुवारी २०२१पर्यंत बंद ठेवण्‍यात येत आहेत. या कालावधीत ऑनलाईन/दुरस्‍थ शिक्षण यांना परवानगी राहील व त्‍याला अधिक वाव देण्‍यात यावा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला