शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

राज्य माहिती आयोगाच्या ‘वेबपोर्टल’वर आता तक्रारपेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:18 IST

अकोला : माहिती अधिकारात अर्ज दाखल करणाऱ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाच्या ‘वेबपोर्टल’वर आता तक्रारपेटी लावण्यात ...

अकोला : माहिती अधिकारात अर्ज दाखल करणाऱ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाच्या ‘वेबपोर्टल’वर आता तक्रारपेटी लावण्यात आली आहे. माहिती अधिकारातील अर्जांसंदर्भात ऑनलाइन तक्रारपेटीद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण तातडीने करण्यात येणार आहे.

माहितीच्या अधिकारात माहिती मिळविण्यासाठी वेगवेगळ्या विभागांत अर्ज सादर करण्यात येतात. परंतु माहिती अधिकारात माहिती मिळविण्यासाठी केलेला अर्ज संबंधित विभागांत स्वीकारण्यात येत नाही, अर्ज स्वीकारण्यासाठी संबंधित अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नाही, दाखल केलेल्या अर्जाची अनेकदा दखल घेण्यात येत नाही, अर्ज केल्यानंतर माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येते त्यामुळे संबंधित विषयाची माहिती मिळत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी अर्जदारांकडून होत असतात. त्यामुळे माहिती अधिकारात माहिती मिळण्यासाठी अर्जदारांना त्रास होऊ नये, तातडीने माहिती उपलब्ध व्हावी यासाठी माहिती अधिकारात माहिती मिळविण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदारांना त्रास होऊ नये, यासाठी राज्य माहिती आयोगाच्या अमरावती खंडपीठाच्या ‘वेबपोर्टल’वर १० डिसेंबरपासून तक्रारपेटी सुरू करण्यात आली आहे. वेबपोर्टलवर तक्रारपेटीद्वारे ऑनलाइन प्राप्त होणाऱ्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यात येणार आहेत.

ही माहिती नमूद करणे आवश्यक !

माहिती अधिकारात माहिती मिळण्यास त्रास होत असलेल्या अर्जदारांना राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाच्या वेबपोर्टलवरील तक्रारपेटीमध्ये अर्जदारांना मोबाइल क्रमांक, तक्रार असलेल्या संबंधित अधिकाऱ्याचे पद नमूद करणे आवश्यक आहे. माहिती अधिकारात माहिती मिळण्यासाठी अर्जदारांना होणाऱ्या त्रासासंदर्भात तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाच्या वेबपोर्टलवर तक्रारपेटी सुरू करण्यात आली आहे. वेबपोर्टलवरील तक्रारपेटीद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यात येणार आहेत.

-संभाजी सरकुंडे, राज्य माहिती आयुक्त, अमरावती खंडपीठ