शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा परिषद सीईओविरुद्ध पोलिसांत तक्रार

By admin | Updated: January 6, 2016 01:58 IST

सीईओंच्या तक्रारीवरून कारवाई, पोलिसांनी आंदोलन दडपले!

अकोला - बाळापूर तालुक्यातील कळंबा खुर्द येथील रहिवासी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागात कक्षसेवक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षासमोर सुरू असलेले आंदोलन पोलिसांच्या मदतीने दडपल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी घडला. मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या तक्रारीनंतर हे आंदोलन पोलिसांनी दडपले; मात्र त्यानंतर काही वेळातच आंदोलकाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. कळंबा खुर्द येथील भास्कर जगन्नाथ ठाकरे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बाळापूर उपविभागात कक्षसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे कळंबा येथे घर असून, या घराचा १९९८ ते २00५ या आठ वर्षांतील कर नियमित भरला आहे. या ठिकाणी घर बांधायचे असल्याने त्यांनी गृहकर्जासाठी अर्ज केला होता. त्यांना सदर जागेचा नमुना-८ मागण्यात आला. त्यानंतर ठाकरे यांनी ग्रामपंचायतकडे नमुना-८ साठी अर्ज केला; मात्र ग्रामसेवकाने ठाकरे यांच्या जागेची नोंदच नसल्याने नमुना-८ देता येणार नसल्याचे सांगितले. यावरून जागेची नोंद नसताना आठ वर्षे कर वसूल केला, मग तो गेला कोठे, असा प्रश्न उपस्थित करून ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीकरिता बाळापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांकडे तक्रार केली; मात्र यावर कोणतीही चौकशी झाली नाही. नंतर ठाकरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तक्रार केली. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले; मात्र थातूर-मातूर चौकशीनंतर प्रकरण दडपण्यात आले. ठाकरे यांनी मात्र स्वस्थ न बसता न्यायासाठी ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. ग्रामविकास मंत्र्यांनी १८ सप्टेंबर २0१४ रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना आदेश देऊन या प्रकरणाची तातडीने चौकशी व कारवाईचा अहवाल सादर करण्याचे स्पष्ट केले; मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत अद्यापही चौकशी करण्यात आली नाही. त्यामूळे हतबल झालेल्या ठाकरे यांनी ३१ डिसेंबर २0१५ पासून मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या कक्षासमोर सकाळी ११ ते ५ या वेळेत ठिय्या आंदोलन सुरू केले. कुणालाही त्रास न देता, कक्षाच्या समोरील एका कोपर्‍यात ते शासकीय वेळेत आंदोलन करीत व कार्यालय बंद होण्याच्या आधी निघून जात होते; मात्र मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी आंदोलनाची दखल न घेता सदर आंदोलकास पोलिसांच्या मदतीने कक्षासमोरून धाकदपट करून उचलून नेले. आंदोलकाचे आंदोलन दडपल्याने त्यांनी याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी सिंह यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली.