शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांना सामुदायिक श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:23 IST

अकोला : संत गजानन महाराज मंदिर शेगावचे विश्‍वस्त, कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या सामुदायिक श्रद्धांजली कार्यक्रमाने संत नगरी अवतरल्याची अनुभूती ...

अकोला : संत गजानन महाराज मंदिर शेगावचे विश्‍वस्त, कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या सामुदायिक श्रद्धांजली कार्यक्रमाने संत नगरी अवतरल्याची अनुभूती अकोल्यातील आदर्श कॉलनी, आदर्श पार्क येथे श्री. गजानन भक्तांनी घेतली.

संत गजानन महाराज पालखी सोहळा समिती दरवर्षी शेगाव ते पंढरपूर जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे स्वागत करून भाविकांसाठी दर्शन व्यवस्था व महाप्रसादाचे वितरण करीत असते. दरवर्षी होणारा अत्यंत दिमाखदार असा हा धार्मिक सोहळा कोरोनामुळे बंद आहे. पालखी सोहळा समितीला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे संत गजानन महाराज शेगावचे विश्वस्त शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाने पालखी सोहळा समिती व भाविकांनी सामुदायिक श्रद्धांजली कार्यक्रम आदर्श पार्क परिसरात गुरुवारी आयोजित केला होता. ह्या कार्यक्रमात गजानन महाराजांची महाआरती भजन संध्या तसेच महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी मौन श्रद्धांजली व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

गुरुदेव भजन मंडळ सांगवी खुर्द च्या महिला व पुरुष भक्तांनी श्री. गजानन महाराज आरती व सुरेल धार्मिक भजने गायली़ उपस्थित सर्व भजनी मंडळींना पालखी सोहळा समितीच्या वतीने नारळ, शेला टोपी देऊन नमन केले. सामुदायिक श्रद्धांजली कार्यक्रम व भजन सोहळा यशस्वीतेसाठी संत गजानन महाराज पालखी सोहळा समिती आदर्श कॉलनी, आदर्श पार्कच्या सर्व सदस्य गजानन भक्तांनी पुढाकार घेतला.