शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

शेतमाल हमीदराने खरेदीसाठी सरकारच उतरणार बाजारात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:51 IST

अकोला : हमीपेक्षा कमी दराने मूग, उडिदाची खरेदी सुरू  आहे. शेतकर्‍यांचे हे होणारे नुकसान टाळण्यासाठी येत्या ३ ऑक्टोबर रोजी राज्यात शासकीय मूग खरेदी केंद्र सुरू  करण्यात येणार आहे. तसेच एक लाख टन सोयाबीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारच बाजारात उतरणार  असल्याचे वृत्त आहे.

ठळक मुद्देएक लाख टन सोयाबीन घेणार३ ऑक्टोबरपासून मूग खरेदी केंद्र होणार सुरू

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : हमीपेक्षा कमी दराने मूग, उडिदाची खरेदी सुरू  आहे. शेतकर्‍यांचे हे होणारे नुकसान टाळण्यासाठी येत्या ३ ऑक्टोबर रोजी राज्यात शासकीय मूग खरेदी केंद्र सुरू  करण्यात येणार आहे. तसेच एक लाख टन सोयाबीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारच बाजारात उतरणार  असल्याचे वृत्त आहे.यावर्षी मुगाचा काढणी हंगाम सुरू  होऊन एक महिना होत आला, तरी अद्याप शासकीय मूग खरेदी राज्यात सुरू  झाली नाही. सणासुदीचे दिवस असल्याने शेतकर्‍यांना मूग विकावा लागत आहे. केंद्र शासनाने मुगाचे हमीदर प्रतिक्विंटल ५ हजार ३७५ रुपये जाहीर केले असून, प्रतिक्विंटल २00 रुपये बोनसही देण्यात येणार आहे. म्हणजे शासनाने मूग खरेदी केल्यास शेतकर्‍यांना प्रतिक्विंटल ५ हजार ५७५ रुपये दर मिळणार आहेत. पण, बाजारात सध्या ४ हजार ५८0 रुपये प्रतिक्विंटल दराने मूग खरेदी केली जात आहे.म्हणजेच एक हजार रुपयाने शेतकर्‍यांची लूट सुरू  आहे. सोयाबीनचे हमीदर २ हजार ८५0 रुपये आहेत. २00 रुपये बोनस मिळून शेतकर्‍यांना ३ हजार ५0 रुपये प्रतिक्विंटल मिळणार आहेत. पण, बाजारात सध्या सरासरी २,७00 रुपये दराने सोयाबीनची खरेदी केली जात आहे. प्रतवारीनुसार हे दर कमी जास्त होत आहेत. मागच्या वर्षी सोयाबीन खरेदीत शेतकर्‍यांची प्रचंड लूट झाली. १ हजार ८00 ते २ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने शेतकर्‍यांकडून सोयाबीनची खरेदी करण्यात आली. यावर्षी राज्यात ३७ लाखावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. विदर्भात हे क्षेत्र १७ लाख हेक्टरवर आहे. विदर्भात सुरुवातीला पाऊस लांबल्याने या पिकावर त्याचे प्रतिकूल परिणाम झाले आहेत. या सर्व पृष्ठभूमीवर केंद्र शासनाने यावर्षी हमी दराने एक लाख टन सोयाबीन खेरदीचा निर्णय घेतला आहे. सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू  होत असल्याने लवकरच सोयाबीन खरेदी केली जाणार आहे.  

सरकार स्वस्थ बसलेले नाही, अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. तूर, मूग, उडीद आयातीवर नियंत्रण आणले. २00६ पासूनची निर्यात बंदी उठवली. खाद्य तेलावर १0 टक्के आयात शुल्क वाढवले, वाटले सोयाबीनचे दर वाढतील, पण एवढे सर्व करू नही हमीदर मिळत नसतील, तर शासनालाच बाजारात उतरावे लागणार असून, तसा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. राज्यातील एक लाख टन सोयाबीन खरेदी केले जाणार आहे. - पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग.-