शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीतून दुस-या दिवशीही शेतमाल परत गेला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2016 02:08 IST

अकोल्यातील प्रकार; संतप्त शेतक-यांनी विचारला जाब.

अकोला, दि. ३ - बाजार समितीमध्ये मंगळवारपासून शेतकर्‍यांनी थेट खरेदीदारांना शेतमाल विकण्याची पद्धत सुरू झाली. अशा विक्रीसाठी मंगळवारी शेतकर्‍याला आपला माल नगदी पैसे मिळत नसल्याने परत न्यावा लागला. त्यानंतर बुधवारी दुसर्‍या दिवशी पुन्हा एका शेतकर्‍याला कमी भाव मिळाल्याच्या कारणावरून आपली तूर परत न्यावी लागली आहे.बाश्रीटाकळी तालुक्यातील पाटखेड येथील एका शेतकर्‍याने बुधवारी आपली पाच कट्टे तूर विक्रीसाठी आणली; परंतु या शेतकर्‍याच्या तुरीला केवळ ७५५0 रुपयेप्रति क्विंटलचा भाव मिळाल्याने शेतकर्‍याने आपली तूर विकण्यास नकार दिला. त्यानंतर काही शेतकर्‍यांनी एकत्र येऊन बाजार समितीच्या कार्यालयात जाऊन जाब विचारीत सुरू असलेल्या या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. प्राप्त माहितीनुसार या शेतकर्‍याला आपला शेतमाल परत नेण्यासाठी वाहन भाडे देण्यात आल्याचे समजले. या सगळ्या प्रकाराबाबत सचिवांशी संपर्क साधण्याचा अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतरही त्यांनी उत्तर दिले नाही. जेव्हा अकोल्याच्या बाजारपेठेत शेतकर्‍याच्या तुरीला ७५५0 रुपयांचा भाव निश्‍चित झाला, तेव्हा याच दिवशी दुसरीकडे खामगावच्या बाजारपेठेत ७९५0 रुपयांपर्यंंत भाव मिळाल्याचे समजते. तेही खरेदीदाराने २ टक्के अडत देऊन हा भाव दिला आहे. अडत्याच्या मध्यस्थीशिवाय सरळ खरेदीदाराला शेतमाल विकण्यामागे शेतकर्‍याला तेवढा जास्त भाव मिळावा हा उद्देश आहे; परंतु या उद्देशालाच हरताळ फासल्या जात असल्याचे यावरून दिसून येते.