शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यसेवेवर वॉच ठेवणाऱ्या समित्याच बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 13:52 IST

रुग्ण कल्याण समिती, तालुका नियामक सभा घेण्याचा उपक्रम आरोग्य विभागातून बेदखल करण्यात आला आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालये, सर्वोपचार रुग्णालयातील आरोग्य सेवा सर्वसामान्यांना कशी पुरवली जाते, याचा धांडोळा घेण्यासाठी असलेल्या रुग्ण कल्याण समिती, तालुका नियामक सभा घेण्याचा उपक्रम आरोग्य विभागातून बेदखल करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांबाबत मे २०१९ अखेरपर्यंत तालुकानिहाय ६० सभा घेण्याचे नियोजन असताना त्यापैकी एकही सभा झालीच नसल्याचा अहवाल आहे, तर नियामक मंडळाच्या १८० मधून केवळ २२ सभा झाल्या आहेत. यावरून जिल्ह्यातील आरोग्यसेवेकडे हा विभाग किती लक्ष देत आहे, हे स्पष्ट होत आहे.रुग्णकल्याण समितीच्या कामाचा आढावा घेताना हा प्रकार उघड झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना दिलेल्या माहितीनुसार, रुग्णकल्याण समितीच्या बैठका, कार्यकारी मंडळाच्या बैठकाही अत्यल्प झाल्या आहेत. ग्रामीण भागातील सात तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील रुग्णकल्याण समितीच्या बैठका घेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार अकोला तालुक्यासाठी १२, अकोट-६, बाळापूर-८, बार्शीटाकळी-८, मूर्तिजापूर- ८, पातूर-१०, तेल्हारा-८ असे उद्दिष्ट आहे. त्यापैकी एकही सभा मे २०१९ पूर्वीच्या काळात झालेली नाही, तर तालुकानिहाय कार्यकारी मंडळाच्या बैठकांचे १८० एवढे उद्दिष्ट आहे. त्यापैकी केवळ २२ बैठकाच झाल्या आहेत. १५८ सभा झाल्याच नसल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आली. हा प्रकार आरोग्य सेवा पुरती वाºयावर सोडण्याचा असल्याचे उघड होत आहे.तर शहरी भागातील ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय या संस्थांतर्गत मे २०१९ पर्यंतच्या काळात १४ नियामक सभा घेण्याचे उद्दिष्ट होते; मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने सभा घेता आल्या नाहीत, असे सांगण्यात आले. आरोग्यसेवा सुरळीत चालण्यासाठी यापुढे तत्काळ नियामक व कार्यकारी मंडळाच्या सभा घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद