लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या श्रीगणेशाचे आगमन शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी मोठय़ा उत्साहात व वाजत-गाजत झाले. यावर्षी तब्बल १२ दिवस चालणार्या या उत्सवामध्ये जिल्हय़ात दीड हजारावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘श्रीं’ची मोठय़ा भक्तिभावाने स्थापना केली आहे. या उत्सवामुळे संपूर्ण वातावरण हे भक्तिमय झाले आहे. अकोला शहरात सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. दिवसभरात पावसाच्या तुरळक सरीसह रिमझिम पाऊसही बरसला; मात्र यामुळे भक्तांच्या उत्साहाला कुठेही आडकाठी झाली नाही. अनेक भक्तांनी आपल्या बाप्पाला प्लास्टिकमध्ये झाकून मिरवणुकीद्वारे स्थापना मंडपाकडे नेले. दिवभरात गणेशमूर्तीसह सजावटीचे तसेच पूजेच्या साहित्याची मोठय़ा प्रमाणात विक्री झाली. शहरातील सर्व रस्त्यांवर ढोल-ताशांचा गजर ऐकू येत होता. अकोला शहरातील मानाचा मानल्या जाणार्या बाराभाई गणपतीची भक्तिभावाने प्रतिष्ठापना करण्यात आली. बाराभाई गणेशोत्सवाची १२४ वर्षांपासूनची ही परंपरा नाथ इंगळे यांच्या तिसर्या पिढीने कायम ठेवली आहे. बाराभाईचा गणपती विदर्भात प्रसिद्ध आहे. विसर्जन मिरवणुकीत हा गणपती मानाचा व ऐतिहासिक म्हणून प्रथम क्रमांकावर असतो. या गणपतीची पूजाअर्चा केल्यानंतरच विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होतो.
आले गणराय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:28 IST
अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या श्रीगणेशाचे आगमन शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी मोठय़ा उत्साहात व वाजत-गाजत झाले. यावर्षी तब्बल १२ दिवस चालणार्या या उत्सवामध्ये जिल्हय़ात दीड हजारावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘श्रीं’ची मोठय़ा भक्तिभावाने स्थापना केली आहे. या उत्सवामुळे संपूर्ण वातावरण हे भक्तिमय झाले आहे.
आले गणराय!
ठळक मुद्देमोठय़ा उत्साहात व वाजत-गाजत झाले श्रीगणेशाचे आगमन तुरळक सरीसह रिमझिम पाऊसही बरसलाजिल्हय़ात दीड हजारावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली स्थापना