शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त प्रतिबंधित क्षेत्रात; नागरिकांची ये-जा सुरूच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 10:21 IST

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तसेच मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी संयुक्तरीत्या बैदपुरा व खैर मोहम्मद प्लॉट येथील ‘कंटेनमेंट एरिया’ची पाहणी केली

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तसेच मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी संयुक्तरीत्या बैदपुरा व खैर मोहम्मद प्लॉट येथील ‘कंटेनमेंट एरिया’ची पाहणी केली असता त्यांना या भागातून पोलिसांच्या डोळ्यादेखत नागरिकांची ये-जा सुरू असल्याचे आढळून आले. यावेळी कर्तव्यावर तैनात पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी तंबी दिली असून, प्रतिबंधित क्षेत्रातील कोणत्याही नागरिकांना या क्षेत्राबाहेर निघण्यास सक्त मनाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.प्रतिबंधित क्षेत्रात मागील काही दिवसांपासून पोलिसांची नाकाबंदी असतानासुद्धा या भागातील नागरिक विविध कामकाजाच्या निमित्ताने प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या बाहेर निघत असल्याचे दिसून आले आहे. ही धक्कादायक बाब पाहता मनपा प्रशासनाने लागू केलेले आदेश व नाकाबंदी केलेल्या पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. या पाहणीदरम्यान मनपाचे नगर सचिव तथा अतिक्रमण विभाग प्रमुख तथा प्रभारी क्षेत्रीय अधिकारी अनिल बिडवे, पूर्व झोनचे क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते, स्वच्छता व आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर व आरोग्य निरीक्षकांची उपस्थिती होती.

नागरिकांना विचारले घराबाहेर निघण्याचे कारण!जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी बैदपुरा व खैर मोहम्­मद प्लॉट भागाची पाहणी केली असता परिसरात नागरिकांची चांगलीच वर्दळ सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी घराबाहेर फिरणाºया नागरिकांना जिल्हाधिकारी यांनी घराबाहेर निघण्याचे कारण विचारले असता नागरिक उत्तर देऊ शकले नाहीत.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या