शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांनी केली साफसफाई; जिल्हाधिकारी कार्यालयात श्रमदानाव्दारे जिल्हयातील ‘महसूल सप्ताह’चा प्रारंभ

By संतोष येलकर | Updated: August 1, 2023 19:46 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात श्रमदानाव्दारे जिल्हयातील ‘महसूल सप्ताह’चा मंगळवारी प्रारंभ करण्यात आला.

अकोला : जिल्हाधिकारी कार्यालयात श्रमदानाव्दारे जिल्हयातील ‘महसूल सप्ताह’चा मंगळवारी प्रारंभ करण्यात आला. त्यामध्ये स्वत: जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी हातात फावडे घेवून कार्यालय परिसरातील गवत काढले आणि खराट्याने परिसर झाडूनही काढला.

महसूल दिनानिमित्त १ ऑगस्ट रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित श्रमदान कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभागी होवून कार्यालय परिसरात स्वचछताकार्य केले. त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सहभाग घेत श्रमदान केले. हातात घेतलेल्या फावड्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील गवत काढले तसेच खराटा घेवून कार्यालयाचा परिसर झाडून काढला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील श्रमदानात अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, महसूल उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवान, जिल्हा पुरवठा अधिकारी बबन काळे यांच्यासह महसूल विभागाचे इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत श्रमकार्य केले. सफाईकार्यात गोळा केलेले गवत आणि कचरा महापालिकेच्या वाहनाद्वारे वाहून नेण्यात आला.

महसूल सप्ताहात असे कार्यक्रम राबविणारजिल्हयात १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ई- हक्क पोर्टलबाबतची कार्यवाही, महसूल नोंदी दुरुस्ती, गाव तिथे स्मशानभूमी सुविधा निर्माण करण्यासाठी मोहिम, दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप, सैनिकांना प्रमाणपत्र वाटप आदी कार्यक्रम राबविण्यात येतील. सलोखा योजनेत गावागावांतील व शेतातील रस्त्यांबाबत तलाठी, मंडळ अधिकारी स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज निकाली काढण्यासाठी शिबीरे घेण्यात येणार आहेत.

नागरिकांना आवश्यक सेवा उपलब्ध करुन द्या - जिल्हाधिकारीकोणतेही काम पूर्णत्वास नेण्यासाठी सांघिक समन्वय आवश्यक असतो. महसूल सप्ताहात अनेक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा आणि नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप आदी विविध कामे करण्यात येतील. यासोबतच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक काम समन्वयाने पूर्ण करून, सप्ताहातील उपक्रमांबाबत जनजागृती करीत नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी व त्यांना आवश्यक सेवा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिल्या.

टॅग्स :Akolaअकोला