शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकार्‍यांनी केली क्रीडा संकुलाची पाहणी

By admin | Updated: April 17, 2017 16:45 IST

इन डोअर क्रीडा हॉल व मोफत वाचनालयाच्या कामाची जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी १५ एप्रिल रोजी पाहणी केली.

मूर्तिजापूर : स्थानिक क्रीडा संकुलात आमदार हरिष पिंपळे यांच्या अध्यक्षतेखालील क्रीडा संकुल समितीच्या वतीने तालुक्यातील पोलीस भरती करिता इच्छुक असणा-या गरजू युवक-युवतींसाठी भरती पूर्व लेखी व मैदानी प्रशिक्षण मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. याकरिता क्रीडा संकुलातील मैदानात करण्यात आलेल्या सुधारणा, प्रगतीपथावर असलेल्या इन डोअर क्रीडा हॉल व मोफत वाचनालयाच्या कामाची जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी १५ एप्रिल रोजी पाहणी केली. तसेच क्रीडा संकुल समितीतर्फे आयोजित पोलीस भरती पूर्व लेखी व मैदानी मोफत प्रशिक्षण शिबिर उपक्रमाला जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी शुभेच्छा देत विद्यार्थ्यांच्या उज्‍जवल भविष्य घडविण्याकरिता आगामी काळात प्रशासकीय स्तरावरून आवश्यक ते सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. त्यांच्यासोबत आमदार हरीष पिंपळे प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी उपविभागीय अधिकारी भागवत सैदाने, तहसीलदार राहुल तायडे, नायब तहसीलदार वैभव फरताडे, ,क्रीडा संकुलतर्फे प्रशिक्षक विनोद काळपांडे, गजानन काळसरपे ,भाजपा तालुकाध्यक्ष नारायणराव भटकर, संदीप जळमकर, संतोष कपिले, राजू गुल्हाने संतोष भांडे व अन्य अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)